संग्राम भालेराव जोरात...! ९ व्या दिवशी ‘सिम्बा’ने कमावले इतके कोटी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2019 03:35 PM2019-01-06T15:35:08+5:302019-01-06T15:35:29+5:30

ओपनिंग डेवर २०.७२ कोटीची कमाई करून समीक्षक व प्रेक्षक दोन्हींची मने जिंकणाऱ्या ‘सिम्बा’ने नवव्या दिवशीही १३.३२ कोटी कमावले आणि ‘सिम्बा’ची एकूण कमाई १७३.१५ कोटींच्या घरात पोहोचली.

Simmba Box Office Collection Day 9: Ranveer Singh's film 4th highest grossing Hindi movie of 2018 | संग्राम भालेराव जोरात...! ९ व्या दिवशी ‘सिम्बा’ने कमावले इतके कोटी!!

संग्राम भालेराव जोरात...! ९ व्या दिवशी ‘सिम्बा’ने कमावले इतके कोटी!!

googlenewsNext
ठळक मुद्दे दोन आठवड्यानंतरही चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लवकरचं हा चित्रपट २०० कोटींचा आकडा गाठेल, असेही जाणकारांचे मत आहे.

रणवीर सिंग स्टारर ‘सिम्बा’ची बॉक्स आॅफिसवरची घोडदौड अद्यापही सुरू आहे. चित्रपटाच्या रिलीजच्या ९ व्या दिवशीही चित्रपटाने ‘छप्परफाड’ कमाई केली. ओपनिंग डेवर २०.७२ कोटीची कमाई करून समीक्षक व प्रेक्षक दोन्हींची मने जिंकणाऱ्या ‘सिम्बा’ने नवव्या दिवशीही १३.३२ कोटी कमावले आणि ‘सिम्बा’ची एकूण कमाई १७३.१५ कोटींच्या घरात पोहोचली. विशेष म्हणजे, यासोबतचं रणवीरच्या या चित्रपटाने आपल्याच ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाचा विक्रमही तोडला.




बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने २०१० मध्ये ‘बॅड बाजा बारात’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याच्या या पहिल्याच चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळाला. यानंतरचे रणवीरचे बहुतेक चित्रपट हीट ठरले. मात्र, रणवीरला खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ आणि ‘रामलीला’ या चित्रपटांनी. यातील ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट तर रणवीरच्या करिअरमधील टर्निंग पॉईंट ठरला होता. ‘सिम्बा’ने याच चित्रपटाचा रेकॉर्ड तोडला. होय, ‘सिम्बा’ हा चित्रपट नऊ दिवसांत ‘बाजीराव मस्तानी’हून अधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. दोन आठवड्यानंतरही चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. लवकरचं हा चित्रपट २०० कोटींचा आकडा गाठेल, असेही जाणकारांचे मत आहे.
रणवीरच्या ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाने भारतात १८४ कोटींची कमाई केली होती. तर जगभरात ३५८ कोटींचा गल्ला जमवला होता. आता ‘सिम्बा’ एकूण किती कमाई करतो, याकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत.

Web Title: Simmba Box Office Collection Day 9: Ranveer Singh's film 4th highest grossing Hindi movie of 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.