ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या, "हे माझं भाग्य..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2024 14:07 IST2024-03-16T14:06:20+5:302024-03-16T14:07:34+5:30
सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय

ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपमध्ये प्रवेश; म्हणाल्या, "हे माझं भाग्य..."
80 आणि 90 च्या दशकातील हिट गाणी आणि भक्ती संगीतासाठी ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांनी शनिवारी नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुराधा यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलाय. भाजप नेत्यांच्या उपस्थितीत अनुराधा यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केवाय. अनुराधा यांनी पक्षप्रवेश केल्यावर प्रतिक्रिया दिली आहे
पत्रकार परिषदेला संबोधित करताना अनुराधा पौडवाल म्हणाल्या, "सनातन धर्माशी खोलवर संबंध असलेल्या सरकारमध्ये मी सहभागी होत आहे याचा मला आनंद आहे. आज मी भाजपमध्ये सामील होत आहे हे माझे भाग्य आहे." अशाप्रकारे अनुराधा यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली.
#WATCH | Famous singer Anuradha Paudwal joins the Bharatiya Janata Party in Delhi pic.twitter.com/SBFSVLjVU8
— ANI (@ANI) March 16, 2024
अनुराधा पौडवाल यांनी अनेक भाषांमध्ये हजारो गाणी आणि शेकडो भजने गायली आहेत. कर्नाटकातील कारवार येथे जन्मलेल्या पौडवाल यांनी अवघ्या 19 व्या वर्षी 'अभिमान' या हिट चित्रपटासाठी 'ओंकारम बिंदू संयुक्तम'मधून गायनात पदार्पण केले. हे गाणे एसडी बर्मन यांनी संगीतबद्ध केले होते. अनुराधा यांच्या भाजप प्रवेशामुळे विविध स्तरांवर प्रतिक्रिया उमटत आहेत