शॉकिंग! गाणं गाता गाताच गेला जीव..., मल्याळम गायक एडवा बशीर यांचं निधन, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 05:22 PM2022-05-29T17:22:34+5:302022-05-29T17:30:31+5:30

मल्याळम संगीतसृष्टीतील एक लोकप्रिय ज्येष्ठ गायक एडवा बशीर (Edava Basheer ) आता आपल्यात नाहीत. 78 वर्षीय एडवा लाईव्ह परफॉर्मन्स देत असताना अचानक स्टेजवर कोसळले आणि त्यादरम्यान त्यांचं निधन झालं.

Singer Edava Basheer collapses on stage, dies | शॉकिंग! गाणं गाता गाताच गेला जीव..., मल्याळम गायक एडवा बशीर यांचं निधन, पाहा VIDEO

शॉकिंग! गाणं गाता गाताच गेला जीव..., मल्याळम गायक एडवा बशीर यांचं निधन, पाहा VIDEO

googlenewsNext

Singer Edava Basheer collapses on stage, dies : मल्याळम संगीतसृष्टीतील एक लोकप्रिय ज्येष्ठ गायक एडवा बशीर (Edava Basheer ) आता आपल्यात नाहीत. 78 वर्षीय एडवा लाईव्ह परफॉर्मन्स देत असताना अचानक स्टेजवर कोसळले आणि त्यादरम्यान त्यांचं निधन झालं. काल 28 मे 2022 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मल्याळम चित्रपटसृृष्टीवर शोककळा पसरली आहे.
 
केरळच्या अलाप्पुझामध्ये एका कार्यक्रमात एडवा मुख्य अतिथी म्हणून सामील झाले होते. या कार्यक्रमात त्यांनी गायक के. जे. येसुदास यांचं गाणं सादर केलं. ‘माना हो तुम बेहद हसीन’ हे गाणं ते गात होते. त्यांच्या गाण्यावर उपस्थित चाहते मंत्रमुग्ध होऊन थिरकत होते. गाण्याचं अखेरचं कडवं गात असतानाच ते स्टेजवर अचानक कोसळले. त्यांना तात्काळ एका खासगी रूग्णालयात हलवण्यात आलं. मात्र रूग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. काल रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली.

त्यांच्या स्टेज परफॉर्मन्स दरम्यानचा एक व्हिडीओही समोर आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. यात एडवा गात असताना अचानक कोसळताना दिसतात. हा व्हिडीओ पाहून त्यांच्या चाहत्यांना जबर धक्का बसला आहे.

एडवा बशीर हे संगीतसृष्टीतील मोठं नावं होतं. त्यांनी स्वाती थिरूनल संगीत अकादमीत संगीतातील पदवी घेतली होती. 1972 साली त्यांनी कोल्लम संगीतालय गमेला मंडलीची स्थापना केली होती. ‘वीना वायिकुम’ या चित्रपटातून त्यांनी संगीतक्षेत्रात डेब्यू केला होता. एडवा यांनी येसुदास व रफींचे गाणे ऐकून गायला सुरुवात केली होती.

Web Title: Singer Edava Basheer collapses on stage, dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.