३९ वर्षांपासून गायक कैलाश खेर यांनी एकही मिठाई खाल्ली नाही! डाएट नाही तर 'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 10:32 AM2024-09-25T10:32:23+5:302024-09-25T10:32:45+5:30
गायक कैलाश खेर यांनी नुकत्याच एका मुलाखतीत त्यांनी गेल्या ३९ वर्षांपासून एकाही मिठाईचा आस्वाद का घेतला नाही, याचं थक्क करणारं कारण सांगितलं नाही (kailash kher)
'सय्या', 'मेरे निशान', 'जय जयकारा' अशा गाण्यांंचे गायक कैलाश खेर यांची गाणी लोकप्रिय आहेत. कैलाश खेर यांनी हिंदी नव्हे तर मराठी गाणीही गायली आहेत. कैलाश खेर यांचा स्वतःचा एक चाहतावर्ग आहे. कैलाश खेर आज प्रेक्षकांच्या गळ्यातले ताईत असले तरीही त्यांनी संघर्षाचा काळही बघितला आहे. नुकत्याच एका मुलाखतीत कैलाश खेर यांनी गेल्या ३९ वर्षांपासून एकही मिठाई का खाल्ली नाही, याचा खुलासा केलाय.
कैलाश यांनी मिठाई न खाण्यामागचं सांगितलं भावुक कारण
एका मुलाखतीत कैलाश यांनी मिठाई न खाण्यामागचं भावुक कारण सांगितलं. कैलाश यांनी गेल्या ३९ वर्षांपासून मी एकाही मिठाईला हात लावला नाहीय. यामागे डायबिटीज किंवा अन्य कोणतंही हेल्थविषयक कारण नाही. कैलाश हे १२ वर्षांचा असताना कैलाश यांचं त्यांच्या कुटुंबासोबत भांडण झालं होतं. तुम्ही थुंकून चाटता, अशा शब्दात कैलाश यांनी एकाला सुनावलं होतं. अवघ्या १२ वर्षांच्या मुलाच्या तोंडी असे अपशब्द म्हणून, कैलाश यांच्या कुटुंबाने त्यांना बेदम मारलं होतं. त्यामुळे कैलाश यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी त्यांच्या आईने त्यांना विचारलं की, "तुला माझ्या हातचा कलाकंद, गाजरचा हलवा आवडतो. घर सोडल्यावर तुला मिठाई कशा खायला मिळणार?"
आईची ही गोष्ट ऐकून कैलाश तिला म्हणाले, "आई मी तुझाच आहे. यापुढे मी मिठाई खाणार नाही. कोणत्याही गोड वस्तूला स्पर्श करणार नाही." अशाप्रकारे १२ वर्षांचं असल्यापासूनच कैलाश यांनी कोणतीही मिठाई सेवन केली नाही. केवळ मिठाईच नाही तर थंड आणि आंबटगोड पदार्थांचा आस्वाद घेतला नाही. मी खूप हट्टी आहे. एकदा ठरवलं नाही तर नाहीच. त्यामुळे मी गोड पदार्थ खाणं कायमचं बंद केलं." अशाप्रकारे कैलाश यांनी खुलासा केला.