-तर KKचा जीव वाचला असता ...! पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांचा मोठा खुलासा!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 03:28 PM2022-06-02T15:28:59+5:302022-06-02T15:31:06+5:30

केकेचा (Singer KK cause of Death) मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. आता शवविच्छेदन करणाऱ्या एका डॉक्टरांनी केकेच्या मृत्यूबद्दल एक मोठा खुलासा केला आहे.

Singer Kk Life Could Have Been Saved If Cpr Was Given On Time Says Doctor Who Conducted Autopsy Or Postmortem | -तर KKचा जीव वाचला असता ...! पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांचा मोठा खुलासा!!

-तर KKचा जीव वाचला असता ...! पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांचा मोठा खुलासा!!

googlenewsNext

Doctor Who Conducted Postmortem reveals on singer KK Death : बॉलिवूडचा लाडका सिंगर केके उर्फ कृष्णकुमार कुन्नथ (KK Krishnakumar Kunnath) याच्या मृत्यूच्या बातमीनं सगळ्यांना हादरवून सोडलं. चाहते अद्यापही या धक्क्यातून सावरलेले नाहीत. केके आपल्यात नाही, यावर अद्यापही चाहत्यांचा विश्वास बसत नाहीये. 31 मे 2022 च्या रात्री एका लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान केकेची प्रकृती बिघडली आणि यानंतर काही तासांतच त्याच्या मृत्यूची बातमी आली.

केकेचा (Singer KK cause of Death) मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झालं आहे. केकेच्या यकृत आणि फुफ्फुसाची स्थिती फारशी ठीक नव्हती, हेही या अहवालातून समोर आलं. आता केकेच्या पार्थिवाचं शवविच्छेदन करणाऱ्या एका डॉक्टरांनी केकेच्या मृत्यूबद्दल एक मोठा खुलासा केला आहे. या डॉक्टरांच्या मते, केकेच्या हार्टमध्ये काही ब्लॉकेज होते. त्याला योग्यवेळी सीपीआर मिळाला असता तर कदाचित त्याचे प्राण वाचवता आले असते.

कुठे झाली चूक?
केकेचं पोस्टमार्टम करणाऱ्या एका डॉक्टरांनी पीटीआयशी बोलताना महत्त्वपूर्ण खुलासा केला. ते म्हणाले, ‘केके दीर्घकाळापासून हृदयासंबधित समस्यांशी झुंज देत होता. मात्र त्यावर उपचार झालेच नाहीत. त्याच्या डाव्या बाजूच्या मेन आर्टरीमध्ये एक मोठा ब्लॉकेज होता. उर्वरित आर्टरीजमध्येही लहान-लहान ब्लॉकेज होते. लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान अत्याधिक एक्साइटमेंटमुळे ब्लड फ्लो थांबला आणि केकेला हृदयविकाराचा झटका आला. हेच त्याच्या मृत्यूचं कारण ठरलं. त्याच्या लेफ्ट मेन कोरोनरी आर्टरीमध्ये 80 टक्के ब्लॉकेज होतं.’

रक्तपुरवठा थांबला आणि....
मंगळवारी 31 मे रोजी लाईव्ह कान्सर्टदरम्यान केके परफॉर्मन्स देत होता. तो गाणं गात होता. त्या गाण्यावर थिरकत होता. गर्दीसोबत स्टेजभर फिरत होता. यामुळे अतिउत्साहामुळे त्याचा रक्त पुरवठा थांबला. यामुळेच तो बेशुद्ध झाला आणि त्याला हृदयविकाराचा झटका आला. यादरम्यान त्याला ताबडतोब सीपीआर दिला असता तर त्याचा जीव कदाचित वाचला असता.
केकेवर आज भावुक वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत त्याच्या मुलाने पित्याच्या चितेला मुखाग्नी दिला. 
 

Web Title: Singer Kk Life Could Have Been Saved If Cpr Was Given On Time Says Doctor Who Conducted Autopsy Or Postmortem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.