गायक किशोर कुमार यांचा आज जन्मदिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2016 09:08 AM2016-08-04T09:08:52+5:302016-08-04T14:38:52+5:30
प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचा आज जन्मदिवस. अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बऱ्याच नामांकित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. १९५४ला बिमल ...
tyle="margin-bottom: 15px; padding: 0px; border: 0px; outline: 0px; vertical-align: top; font-family: itf_devanagarimediumfont; color: rgb(0, 0, 0); font-size: 15px; line-height: 26px; background-image: initial; background-attachment: initial; background-size: initial; background-origin: initial; background-clip: initial; background-position: initial; background-repeat: initial;">प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचा आज जन्मदिवस. अभिनेता म्हणून किशोर कुमार यांनी बऱ्याच नामांकित दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. १९५४ला बिमल रॉय यांच्यासोबत "नौकरी" आणि १९५७ला हृषिकेश मुखर्जींसोबत "मुसाफिर" या चित्रपटात त्यांनी काम केले. किशोर कुमार यांनी संगीतात कोणतेही तंत्रशुद्ध शिक्षण घेतले नसल्याने "नौकरी" या चित्रपटामध्ये त्यांना गाण्याची संधी दिली जाऊ नये असे संगीतकार सलिल चौधरी यांचे म्हणणे होते. पण किशोर यांचे गाणे ऐकून हेमंत कुमार यांच्याऐवजी किशोर कुमार यांना "छोटा सा घर होगा" हे गाणे गाण्यास संधी देण्यात आली .
किशोर कुमार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९मध्ये मध्य प्रदेशातील खंडवा या गावी झाला. त्यांचे नाव आभास कुमार ठेवण्यात आले. त्यांचे वडील कुंजलाल गांगुली हे पेशाने वकील होते, आई गौरीदेवी या एका श्रीमंत घराण्यातील होत्या. किशोर कुमार आपल्या भावंडात सर्वात लहान होते. त्यांना अशोक कुमार, सती देवी आणि अनूप कुमार अशी भावंडे होती.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांना खूप संघर्ष करावा लागला. त्या काळात अशोक कुमार बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाल्यावर, गांगुली परिवाराचे मुंबई दौरे वाढत गेले. आभास कुमार यांनी याच वेळी आपले नाव किशोर कुमार ठेवून आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली. बॉम्बे टॉकीजमध्ये ते समूह गायक म्हणून काम करत. अभिनेता म्हणून त्यांचा पहिला चित्रपट "शिकारी" (१९४६) होता. या चित्रपटात अशोक कुमार यांची प्रमुख भूमिका होती. संगीतकार खेमचंद प्रकाश यांनी किशोर कुमार यांना "जिद्दी" (१९४६) या चित्रपटासाठी गाण्याची संधी दिली. हे गाणे होते "मरने की दुआएं क्यों मांगू". यानंतर किशोर कुमार यांना अनेक गाणी गाण्याच्या संधी मिळाल्या. १९४९ साली त्यांनी मुंबईत राहण्याचे निश्चित केले. बाँम्बे टॉकिज आणि फनी मजुमदार दिग्दर्शित "आंदोलन" (१९५१) या चित्रपटात त्यांनी हिरोचे काम केले. आपल्या भावाच्या मदतीने किशोर कुमार यांना अभिनेता म्हणून बरीच कामे मिळत असली तरी त्यांना एक यशस्वी गायक व्हायचे होते. त्यांना अभिनयात विशेष रूची नव्हती. पण अशोक कुमार यांना घाबरत असल्यामुळे ते अभिनय करत राहिले. किशोर कुमार संगीत शिकलेले नव्हते. सुरुवातीला ते के. एल्. सैगल यांची नक्कल करत. सुप्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांना किशोर यांची गायकी खूप आवडे. त्यांच्या सल्ल्यानुसारच किशोर कुमार यांनी नक्कल करण्याचे सोडून आपली एक विशिष्ट शैली निर्माण केली. किशोर कुमार यांनी १९९७च्या शेवटी आणि १९८०च्या सुरुवातीला निर्माता-दिग्दर्शक म्हणून अनेक चित्रपट केले. बढती का नाम दाढी (१९७८), जिन्दगी (१९८१) व दूर वादियों में कहीँ (१९८२) या त्यांच्या चित्रपटांपैकी एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर झळकला नाही. किशोर कुमार यांचा अभिनेता म्हणून शेवटचा चित्रपट "दूर वादियों में कहीँ" होता. राहुल देव बर्मन आणि राजेश रोशनच्या पाठिंब्याने त्यांनी अमित कुमार या आपल्या मुलालाही १९८०च्या दशकात पार्श्वगायक बनवले. याच वेळी किशोर कुमार अनिल कपूरच्या पहिल्या चित्रपटासाठी (वह सात दिन) व तसेच त्याच्या पहिल्या सुपरहिट चित्रपटासाठी (मिस्टर. इंडिया) गायले. त्यांनी आर. डी. बर्मन यांच्यासोबत सागर या चित्रपटात सुपरहिट गाणी गायली. याच कालावधीत त्यांनी रिटायर होऊन खंडवाला जाण्याचे ठरवले. परंतु ऑक्टोबर १३, १९८७ साली त्यांचे हृदय विकाराने निधन झाले. किशोर कुमार यांनी १४ चित्रपटांची निर्मिती केली आणि काहींचे लेखन करून संगीतही दिले. त्यापैकी ६ चित्रपट अपूर्ण राहिले. त्यांनी ५ चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या असून, त्यापैकी २ अपूर्ण राहिले. त्यांनी १२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले त्यापैकी ४ अपूर्ण राहिले.
- प्रफुल्ल गायकवाड