Singer Lucky Ali : लकी अली यांच्या जमिनीवर भू-माफियांचे अतिक्रमण; महिला आयएएस अधिकारीही सामिल; पोस्ट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 11:02 AM2022-12-05T11:02:46+5:302022-12-05T12:00:23+5:30

'ओ सनम' फेम गायक लकी अली अडचणीत सापडले आहेत. गेल्या ५० वर्षांपासून राहत असलेल्या त्यांच्या कर्नाटक येथील जमिनीवर काही भू-माफिया अतिक्रमण करत आहेत.

singer-lucky-ali-post-went-viral-land-being-encroached-illegally-by-land-mafia-in-karnataka | Singer Lucky Ali : लकी अली यांच्या जमिनीवर भू-माफियांचे अतिक्रमण; महिला आयएएस अधिकारीही सामिल; पोस्ट व्हायरल

Singer Lucky Ali : लकी अली यांच्या जमिनीवर भू-माफियांचे अतिक्रमण; महिला आयएएस अधिकारीही सामिल; पोस्ट व्हायरल

googlenewsNext

Singer Lucky Ali : 'ओ सनम' फेम गायक लकी अली अडचणीत सापडले आहेत. गेल्या ५० वर्षांपासून राहत असलेल्या त्यांच्या कर्नाटक येथील जमिनीवर काही भू-माफिया अतिक्रमण करत आहेत. याविरोधात पोलिसात तक्रार करुनही काहीच झालेले नाही. कारण यामध्ये स्वत: महिला आयएएस अधिकारी सामील आहेत. अखेर लकी अली यांनी फेसबुकवर पोस्ट टाकत मदत मागितली आहे.  (Land Mafia)

काय म्हणाले लकी अली ?

'कर्नाटकच्या केंचेनल्ली भागात माझी जमीन आहे. गेल्या ५० वर्षांपासून माझे कुटुंब तेथे वास्तव्यास आहे. ती एक ट्रस्ट प्रॉपर्टी आहे. मात्र बंगलोर भुमाफिया सुधीर रेड्डी आणि त्यांची आयएएस पत्नी रोहिणी सिंधुरी माझ्या जमिनीवर अतिक्रमण करत आहेत. ते जबरदस्ती माझ्या प्रॉपर्टी मध्ये घुसत आहेत. त्यांच्याकडे कागदपत्रेही नाहीत. माझ्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार हे बेकायदेशीर आहे. त्यांच्याकडे कोर्टाची ऑर्डरही नाही. याविरोधात मी एसीपी कडे तक्रारही केली. पण मला सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. उलट पोलिसच माफियांना पाठिंबा देत आहेत.हे प्रकरण सोशल मीडियावर पोस्ट करण्यावाचुन काहीच पर्याय राहिला नाही.'

लकी अली यांचे फॅन्स आता त्यांच्या पाठिंब्यासाठी पुढे आले आहेत. लकी अली यांनी चाहत्यांनाच मदत मागितली आहे. सध्या लकी अली हे विविध ठिकाणी कॉन्सर्ट्स मध्ये व्यस्त आहेत.

Web Title: singer-lucky-ali-post-went-viral-land-being-encroached-illegally-by-land-mafia-in-karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.