'आय लव्ह उद्धव..' ; गायक लकी अलींचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 03:08 PM2022-06-24T15:08:11+5:302022-06-24T15:08:59+5:30

Lucky Ali: आपल्या आवाजाच्या जोरावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लकी अली यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे.

singer lucky ali shows his love towards chief minister of maharashtra uddhav thackeray | 'आय लव्ह उद्धव..' ; गायक लकी अलींचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

'आय लव्ह उद्धव..' ; गायक लकी अलींचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा

googlenewsNext

सध्या राज्याच्या राजकारणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी पक्षात बंड करत संपूर्ण राजकारणात खळबळ माजवली. त्यामुळे सामान्यांपासून सेलिब्रिटी, दिग्गजांपर्यंत या एकाच विषयाची चर्चा रंगताना दिसत आहे. यात सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना पाठिंबा देणारे आणि त्यांना विरोध करणारे असे दोन गट पडल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे या वादात आता प्रसिद्ध गायक लकी अली (Lucky Ali) यांनी उडी घेतली आहे.

आपल्या आवाजाच्या जोरावर श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लकी अली यांनी नुकतीच सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सोशल नेटवर्किंगवर त्यांची पोस्ट व्हायरल होत असून चर्चेचा विषय ठरत आहे.

काय आहे लकी अली यांची पोस्ट?

लकी अली यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देत, 'आय लव्ह उद्धव, मी त्यांच्या राज्यकारभाराचा आदर करतो. विषय संपला,' असं त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. सध्या त्यांची ही पोस्ट व्हायरल होत असून अल्पावधीत तिला ३ हजारांपेक्षा जास्त लाइक्स आणि कमेंट्स आल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वीही लकी अली यांनी मुख्यमंत्र्यांविषयी भाष्य केलं होतं. मागील वर्षी लकी अली यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुंबई योग्य व्यक्तीच्या हाती गेल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 

Web Title: singer lucky ali shows his love towards chief minister of maharashtra uddhav thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.