फोटो पाहून संतापली प्रसिद्ध गायिका, थेट PM मोदींवर निशाणा साधत म्हणाली, "आदिवासी समाजातील.."
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 01:43 PM2024-04-02T13:43:40+5:302024-04-02T13:45:30+5:30
प्रसिद्ध गायिका नेहा सिंग राठोड हिने पंतप्रधान मोदींनी अडवाणींना भारतरत्न देताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंना दिलेल्या वागणुकीवर टीका केली आहे
पंतप्रधान मोदींनी काल भाजपा नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देऊन सन्मानित केलं. अडवाणींच्या निवासस्थानी जाऊन पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपतींनी त्यांचा भारतरत्न देऊन गौरव केला. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. परंतु हे फोटो पाहून प्रसिद्ध गायिका नेहा सिंग राठोड हिने पंतप्रधान मोदींच्या वर्तनावर टीका केली आहे. काय म्हणाली नेहा?
नेहा सिंगने सोशल मीडियावर फोटो शेअर करत लिहिलंय की, "भारताच्या राष्ट्रपतींना तुम्ही दिलेली वागणूक अत्यंत चुकीची आहे. तुमच्याकडून सामान्य शिष्टाचाराची अपेक्षा करणं म्हणजे मुर्खपणाचं लक्षण आहे. पण सांविधानिक रित्या राष्ट्रपतींचं स्थान पंतप्रधानांपेक्षा वरचढ आहे. आणि राष्ट्रपती उभ्या असताना पंतप्रधानांनी बसणं चुकीचं आहे. देशातील आदिवासी समाज आणि महिला वर्ग राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना आपला आदर्श मानतो. तुम्ही त्यांच्या भावना दुखावल्या आहेत सर"
भारत की राष्ट्रपति के साथ आपका ये बर्ताव ठीक नहीं है सर!
— Neha Singh Rathore (@nehafolksinger) March 31, 2024
आपसे सामान्य शिष्टाचार की बात करना भी मूर्खता है;
पर संवैधानिक पदसोपान के हवाले से मैं ये बात ज़रूर कहूँगी कि राष्ट्रपति के खड़े होने पर प्रधानमंत्री को बैठे नहीं रहना चाहिए.
देश का आदिवासी समाज और महिलाएँ देश की… pic.twitter.com/5NGLIdwfgt
नेहाने लिहिलेल्या पोस्टवर अनेकांनी तिला समर्थन दिलं असून अनेकांनी तिच्यावर टीकाही केलीय. नेहा अनेकदा भाजप आणि भारतीय जनता पार्टीतील नेत्यांवर टीका करत असते. त्यामुळं अनेकदा नेहाला लोकांच्या टीकेला आणि ट्रोलिंगला सामोरं जावं लागतं.