गायिका पुनम श्रेष्‍ठा यांना यावर्षीचा मोहमद रफी पुरस्‍कार जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2017 04:46 AM2017-12-21T04:46:34+5:302017-12-21T10:16:36+5:30

ज्‍येष्‍ठ गायक मोहमद रफी यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी “स्‍पंदन आर्ट” या संस्‍थतर्फे देण्‍यात येणा-या यावर्षीचा दहावा मोहमद रफी जिवन गौरव ...

Singer Punam Shrestha has been awarded Mohamad Rafi Award this year | गायिका पुनम श्रेष्‍ठा यांना यावर्षीचा मोहमद रफी पुरस्‍कार जाहीर

गायिका पुनम श्रेष्‍ठा यांना यावर्षीचा मोहमद रफी पुरस्‍कार जाहीर

googlenewsNext
‍येष्‍ठ गायक मोहमद रफी यांच्‍या वाढदिवसाच्‍या दिवशी “स्‍पंदन आर्ट” या संस्‍थतर्फे देण्‍यात येणा-या यावर्षीचा दहावा मोहमद रफी जिवन गौरव पुरस्‍कार जेष्‍ठ संगितकार श्रीकांत ठाकरे यांना मरणोत्‍तर देण्‍यात येणार असून गायिका पुनम श्रेष्‍ठा यांना यावर्षीचा मोहमद रफी पुरस्‍कार देण्‍यात येणार असल्‍याची घोषणा स्‍पंदनतर्फे मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज केली.

देशाचे उपराष्‍ट्रपती व्यंकय्या नायडू आणि राज्‍यपाल सी विद्यासागर राव यांच्‍या हस्‍ते या पुरस्‍काराचे वितरण करण्‍यात येणार असून 24 डिसेंबर 2017 रोजी मोहमद रफी यांच्‍या वाढदिवशी हा सोहळा वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात संध्‍याकाळी 5 वाजता होणार असल्‍याचेही आमदार आशिष शेलार यांनी आज जाहीर केले आहे. या निमित्‍ताने प्रसाद महाडकर यांच्‍या “जिवनगाणी” तर्फे रफी यांच्‍या गाण्‍यांचा कार्यक्रमही आयोजित करण्‍यात आला असून सर्वांसाठी हा कार्यक्रम खुला ठेवण्‍यात आला आहे.

गेली नऊ वर्षे स्‍पंदन आर्ट तर्फे मोहमद रफी यांच्‍या नावाने हे पुरस्‍कार देण्‍यात येतात. मोहमद रफी यांच्‍या सोबत प्रत्‍यक्ष काम केलेल्‍या एका व्‍यक्‍तीला जिवन गौरव एक लाखांच धनादेश व स्‍मृती चिन्‍ह देऊन गौरविण्‍यात येते तर 51 हजार रुपये धनादेश व स्‍मृती चिन्‍ह देऊन एका व्‍यक्‍तीला रफी पुरस्‍काराने सन्‍मानित करण्‍यात येते. यावर्षी हा पुरस्‍कार ज्‍येष्‍ठ संगितकार श्रीकांत ठाकरे यांना मरोणत्‍तर देण्‍यात येणार असून त्‍यांच्‍या पत्‍नी मधुवंती ठाकरे या पुरस्‍कार स्विकारणार आहेत

यापुर्वी पहिल्‍या महिला संगितकर उषा खन्‍ना, उदित नारायण, यांच्‍यासह संगीतकार आनंदजी, गायक अमीत कुमार यांच्यासह ज्येष्ठ गायिका आशा भोसले, सुरेश वाडकर, शमशाद बेगम, संगितकार रवी, शैलेंद्र सिंग, नौशाद अली, पॅरेलाल, सुमन कल्याणपूर, अनुराधा पौडवाल, खय्याम या मान्यवर कलावंतासह ख्यातनाम निवेदक अमिन सयानी यांनांही यापुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

मोहमद रफी  साहेबांचे व त्‍यांच्‍या कुटुंबियांचे माझ्या वांद्रे पश्चिम विधानसभा मतदार संघात वास्तव्यास असून रफी साहेबांचा मी चाहता आहे. म्‍हणून गेली नऊ वर्षे आम्‍ही हा पुरस्‍कार सोहळा आयोजित करीत असून या उपक्रमात रफी साहेबांचे कुटुंबीयही सहभागी होतात. तर आजपर्यंत अत्‍यंत दिग्‍गजांनी हे पुरस्‍कार स्विकारून या सोहळयाची उंची वाढविली. यावर्षी प्रथमच मरणोत्‍तर जिवनगौरव पुरस्‍कार देण्‍याचा विचार आम्‍ही केला आणि ज्‍येष्‍ठ संगितकार श्रीकांत ठाकरे यांचे नाव पुढे आले. कारण श्रीकांत ठाकरे यांच्‍या आग्रहास्‍तव मोहमद रफी यांनी मराठी गाणी गायली आणि ती प्रचंड  लोकप्रिय तर ठरलीच शिवाय ती अजरामरही झाली. त्‍यामुळे ठाकरे कुटुंबियांनी हा पुरस्‍कार स्विकारण्‍याचे मान्‍य केले, त्‍यांचे आभार मानतो असे आमदार अॅड आशिष शेलार यांनी म्‍हटले आहे.

Web Title: Singer Punam Shrestha has been awarded Mohamad Rafi Award this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.