वरुण-नताशानंतर बॉलिवूड सिंगर शिल्पा राव अडकली विवाह बंधनात, लग्नाचा पहिला फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 04:05 PM2021-01-28T16:05:22+5:302021-01-28T16:07:54+5:30

वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नानंतर लोकप्रिय गायिका शिल्पा रावच्या लग्नाची बातमी समोर आली आहे.

Singer shilpa rao ties the knot with ritesh krishnan | वरुण-नताशानंतर बॉलिवूड सिंगर शिल्पा राव अडकली विवाह बंधनात, लग्नाचा पहिला फोटो आला समोर

वरुण-नताशानंतर बॉलिवूड सिंगर शिल्पा राव अडकली विवाह बंधनात, लग्नाचा पहिला फोटो आला समोर

googlenewsNext

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. वरुण धवन आणि नताशा दलालच्या लग्नानंतर लोकप्रिय गायिका शिल्पा रावच्या लग्नाची बातमी समोर येते आहे. शिल्पाने 25 जानेवारी रोजी तिचा मित्र रितेश कृष्णनसोबत लग्न केले. वरुण-नताशाच्या लग्नाप्रमाणेच शिल्पाचे लग्नदेखील मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित पार पडले. 

शिल्पा रावने इन्स्टाग्रामवर तिच्या लग्नाचा पहिला फोटो शेअर केला आहे.  'मिस्टर अँड मिसेस म्हणून आमचा पहिला सेल्फी' असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. शिल्पाचे पती आणि मित्र रितेश कृष्णन फोटोग्राफर आहे. दोघेही बर्‍याच वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. या मैत्रीचे रुपांतर आता लग्नात झाले आहे. काही दिवसांपूर्वी शिल्पाने तिचा आणि तिच्या पतीच्या लहानपणीचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोला कॅप्शन देताना शिल्पाने लिहिले होते की, ''आमच्या दोघांमध्ये एक कॉमन होती आणि ती म्हणजे आम्ही फोटो काढताना अजिबात हसायचो नाही. आता मला आशा आहे की आम्ही दोघेही हसून आपले उर्वरित आयुष्य घालवू.''

शिल्पा रावने 2007मध्ये आलेले 'अनवर' सिनेमातील 'तोसे नैना लगे रे' गाणं गायलं होते, त्यानंतर ती बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाली होती. गेल्या वर्षी शिल्पा रावने फिल्म इंडस्ट्रीत दहा वर्षे पूर्ण केली. शिल्पाने र10 वर्षांच्या करिअरमध्ये गुलजार साहेब, ए.आर. रहमान आणि दिवंगत यश चोप्रा यांच्यासारख्या दिग्गज लोकांसोबत काम केले आहे.  शिल्पाने गेल्या वर्षी आलेल्या 'वॉर'  सिनेमात 'घुंगरू टूट गए ..' या गाण्यातून जबरदस्त कमबॅक केले होते.  

Web Title: Singer shilpa rao ties the knot with ritesh krishnan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.