महिनाभरापासून इटलीच्या घरात कैद आहे ही बॉलिवूड सिंगर, तिची व्यथा ऐकून वेळीच व्हा सावध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 02:49 PM2020-03-25T14:49:43+5:302020-03-25T14:51:15+5:30

पाहा व्हिडीओ

singer shweta pandit locked in house italy shared her horrible experience due to corona virus-ram |  महिनाभरापासून इटलीच्या घरात कैद आहे ही बॉलिवूड सिंगर, तिची व्यथा ऐकून वेळीच व्हा सावध

 महिनाभरापासून इटलीच्या घरात कैद आहे ही बॉलिवूड सिंगर, तिची व्यथा ऐकून वेळीच व्हा सावध

googlenewsNext
ठळक मुद्देश्वेता पंडितने बॉलिवूडची अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. 

‘मोहब्बतें’ सारख्या सिनेमात गाणे गाणारी बॉलिवूड सिंगर श्वेता पंडित सध्या कोरोना संकटामुळे इटलीत अडकून पडलीय. गेल्या महिनाभरापासून इटलीतील आपल्या घरात ती कैद आहे. महिनाभरात तिने साधा उंबरठाही ओलांडला नाही. श्वेताने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत, ही आपबीती सांगितली.
श्वेताने भारतातील सर्वांना सोशल डिस्टेंसिंगचा सल्ला दिला आहे. शिवाय भारतातील 21 दिवसांच्या लॉकडाऊनलाही पाठींबा दिला आहे.

ती व्हिडीओत म्हणते, ‘कोरोनाने सर्वाधिक बळी घेतलेल्या इटलीत मी सध्या आहे. गेल्या महिनाभरापासून मी घराबाहेर पडलेली नाही. इथे लॉकडाऊन झाले तोपर्यंत बराच उशीर झाला होता. कोरोना व्हायरसने आत्तापर्यत इटलीत 8 हजारांवर बळी घेतले आहेत. रोज सकाळी झोपेतून उठते तेव्हा मला फक्त अ‍ॅम्बुलन्सचा आवाज ऐकू येतो. ही गंमत मुळीच नाही. मी इथे पतीसोबत सुरक्षित असले तरी आई-वडिलांची व भावंडाच्या आठवणीने हैराण झालेय.’

‘कोरोना व्हायरस संपूर्ण जगात पसरला आहे. भारत नशीबवान आहे की, आपल्या देशात फार उशीराने हा व्हायरस पोहोचला. अन्य देशांची स्थिती बघून आपण सावध झालो,’असेही तिने म्हटले आहे.
तुम्हाला आठवत असेलच की, श्वेता पंडितने मध्यंतरी म्युझिक डायरेक्टर अनु मलिक यांच्यावर मीटू अंतर्गत लैंगिण गैरवर्तनाचे आरोप केले होते.

श्वेता पंडितने बॉलिवूडची अनेक लोकप्रिय गाणी गायली आहेत. मोहब्बतें या सिनेमातील ‘पैरो में बंधन है’ हे तिने गायलेले गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. याशिवाय इश्क खुदाई, हल्ला रे, तेरा सरापा, दो धारी तलवार, कुडियां नू ठग ले अशा अनेक गाण्यांना तिने आवाज दिला आहे.

Web Title: singer shweta pandit locked in house italy shared her horrible experience due to corona virus-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.