सोना मोहपात्राने घेतला भाईजानशी ‘पंगा’! चाहत्यांनी असा घेतला ‘बदला’!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 03:34 PM2019-03-07T15:34:39+5:302019-03-07T15:35:49+5:30
सलमान खानचे इंडस्ट्रीत जिगरी मित्र आहेत, तसेच शत्रूही. विवेक ओबेरॉय, अरिजीत सिंग, रणबीर कपूर, सरोज खान या सेलिब्रिटींशी सलमानचे जराही पटत नाही. आता या यादीत आणखी एक नाव चढले आहे, ते कुणाचे तर गायिका सोना मोहपात्राचे.
सलमान खानचे इंडस्ट्रीत जिगरी मित्र आहेत, तसेच शत्रूही. विवेक ओबेरॉय, अरिजीत सिंग, रणबीर कपूर, सरोज खान या सेलिब्रिटींशी सलमानचे जराही पटत नाही. आता या यादीत आणखी एक नाव चढले आहे, ते कुणाचे तर गायिका सोना मोहपात्राचे. सोनाने पुन्हा एकदा भाईजानशी असा काही पंगा घेतला की, भाईजान नाही पण चाहते मात्र बिथरले.
आता हा सगळा मामला काय, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. तर त्याचे झाले असे की, ‘भारत’चे शूटींग संपल्याचे ट्विट सलमानने केले. हे ट्विट तुमच्या आमच्यासारखे सोनाच्या टाईमलाईवरही झळकले. पण हे ट्विट पाहून सोना जाम भडकली. इतकी की, या व्यक्तिचे ट्विट माझ्या टाईमलाईनवर दाखवू नका, असे तिने ट्विटरवर जाहीर करून टाकले.
Dear @twitter I don’t follow this person & would request you to spruce up your algorithm to NOT put his advertised tweets on my timeline. pic.twitter.com/rEaiVGDtXL
— SONA (@sonamohapatra) March 6, 2019
‘मी या व्यक्तिला ट्विटरवर फॉलो करत नाही. त्यामुळे त्याचे ट्विटमाझ्या टाईमलाईनवर दिसता कामा नये. मी विनंती करते की, कृपया हे जाहिरातीचे ट्विट माझ्या टाईमलाईनवरून हटवा,’ असे ट्विट सोनाने केले.
Aukaat ke bahar na jao madamji! Mai to aapko dekh raha hu pehli baar, naam suna pehli bar so phir bhi itna ghamand! Kaiku?
— Rajnikanth Madne (@BeingRajnikanth) March 7, 2019
Sasta Nasha karna bund karo. If you are following someone who is RTing the tweets of SK or someone is following those tweets will be visible to you. In that case you have to block each & everyone who is following SK— คlקєรђ 🇮🇳 (@ImAlpesh) March 6, 2019
Ladki kangna ranaut ke raste chal rahi hai 🤣🤣— Jaydeep Aswar (@aswarjaydeep55) March 7, 2019
Ye sab publicity stunt k liye natak karrahiho bhai se naam juda to publicity hogi naa isliye— Malik Syed@arhamadnan (@msyed182) March 7, 2019
झाले, सोनाने हे ट्विट केले आणि त्यावर भाईजान बोलण्याआधीच, भाईजानचे चाहते बोलत सुटले. भाईजानच्या चाहत्यांनी सोनाला प्रचंड ट्रोल केले. सोनाचे हे ट्विट निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे काही जणांनी म्हटले. तर सोनाला काम मिळत नसल्याने ती खवळली असल्याचा निष्कर्ष काहींनी यातून काढला.
सोनाने सलमानशी पहिल्यांदा पंगा घेतलेला नाही. याआधीही तिने सलमानला लक्ष्य केले होते. काळवीट शिकार प्रकरणानंतर तिने सलमानवर उपरोधिक टीका केली होती. ‘आता वडील माफी मागणार का? आता या इंडस्ट्रीचं काय होणार? त्याला जामीन कधी मिळणार? त्याचा ब्लॉकबस्टर सिनेमा कधी प्रदर्शित होणार? चॅरीटी कार्यक्रम, दबंग कॉन्सर्ट, बिग बॉसच्या तारखा काय असतील?’ असे उपरोधिक ट्विट तिने केले होते