'सिंघम ३' सनी देओल नाही तर अजय देवगण दिसणार !
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2017 07:08 AM2017-10-18T07:08:02+5:302017-10-18T12:38:02+5:30
रोहित शेट्टी सिंघम ३ मध्ये अजय देवगणशिवाय तयार करणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. अजय देवगण ऐवजी ...
र हित शेट्टी सिंघम ३ मध्ये अजय देवगणशिवाय तयार करणार अशी चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून रंगल्या होत्या. अजय देवगण ऐवजी सिंघम ३ मध्ये सनी देओल दिसणार. पण आता स्वत: रोहित शेट्टीने जाहीर केले आहे की अजय देवगणला घेऊनच ते सिंघम ३ बनवणार आहेत. रोहितने स्पष्ट पणे म्हटले की या चित्रपटाचे मालकी हक्क माझ्याकडे आहेत आणि दुसरे कोणी हा चित्रपट बनवू शकता नाही. तो पुढे म्हणाला की सध्या आम्ही गोलमाल अगेनच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहोत. त्यामुळे जेव्हा आम्हाला सिंघम ३ साठी चांगली कथा मिळेल तेव्हा आम्ही या चित्रपटावर काम करायला सुरुवात करु. तसेच मी अजय देवगणबरोबर पुढील चित्रपट करेल तो सिंघम ३च असेल.
खरतर बातमी अशी होती की सिंघम ३ मध्ये अभिनेता सनी देओलला घेतले जाणार होते पण सविस्तर वृत्त असे की सनी देओलला घेऊन सिघम ३ बनवायची खबर होती. त्याचे निर्माते रोहित शेट्टी नसून जयंतीलाल गाडा आहे, जयंतीलाल गाडानी याबद्दल आधीच सांगितले की माझ्या चित्रपटाचे नाव सिंघम ३ नसून एस ३ असे आहे ह्या दोन्हीं चित्रपटांचे एकमेकांशी काही हे संबंध नाहीत ना ह्याच्या कथा सारख्या आहेत आणि त्याचे कलाकार. एस ३ तमिळ चित्रपट सिंघम चा तिसरा भाग आहे ज्याच्या तिन्ही भागाचे दिग्दर्शन हरीने केले आहे. तमिळमध्ये पहिल्या भागाचे नाव सिंघम होते दुसऱ्या चे सिंघम २ तर तिसऱ्या भागाचे नाव एस ३ होते, याच तमिळ एस ३ चित्रपट जयंतीलाल गाडा हिंदी मध्ये बनवणार आहेत. या चित्रपटाच्या शूटिंग ची सुरवात पुढील वर्षी होणार आहे.
एकीकडे रोहित शेट्टी म्हणतो की सिंघम चे मालकी हक्क त्याच्याकडे आहेत आणि दुसरीकडे जयंतीलाल गाडा म्हणतात की त्याच्या चित्रपटाच्या एस ३ चा रोहित शेट्टीच्या चित्रपटाशी काही संबंध नाही आहे. आता हे प्रकरण पुढे जाऊन काय वळण घेणार आहे ते वेळच सांगेल.
ALSO RAED : म्हणून गोलमाल अगेनच्या प्रमोशनमधून गायब आहे रोहित शेट्टी