ओटीटीवर रिलीज झालेला 'सिंघम अगेन' प्राइम व्हिडीओने हटवला; काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 13:41 IST2024-12-26T13:40:56+5:302024-12-26T13:41:30+5:30

ओटीटीवर रिलीज झालेला मल्टिस्टारर सिंघम अगेन सिनेमा प्राइम व्हिडीओवरुन गायब झालाय. काय झालंय नेमकं? (singham again)

singham again movie ott amazon prime removes singham again ajay devgn ranveer singh akshay kumar | ओटीटीवर रिलीज झालेला 'सिंघम अगेन' प्राइम व्हिडीओने हटवला; काय आहे प्रकरण?

ओटीटीवर रिलीज झालेला 'सिंघम अगेन' प्राइम व्हिडीओने हटवला; काय आहे प्रकरण?

२०२४ च्या दिवाळीत रिलीज झालेला 'सिंघम अगेन' सिनेमा चांगलाच चर्चेत राहिला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच छाप पाडली. अजय देवगणसोबत सिनेमात रणवीर सिंग, अक्षय कुमार, करीना कपूर, दीपिका पादुकोण अशी तगडी स्टारकास्ट होती. रोहित शेट्टीने  'सिंघम अगेन' दिग्दर्शित केला होता. हा सिनेमा काहीच दिवसांपूर्वी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला होता. परंतु अचानक हा सिनेमा प्राइम वरुन हटवण्यात आलाय. 

'सिंघम अगेन' प्राइम व्हिडीओवरुन गायब?

काहीच दिवसांपूर्वी प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'सिंघम अगेन' रिलीज झाला होता. हा सिनेमा प्रेक्षक रेंटवर बघू शकत होते. परंतु अचानक 'सिंघम अगेन' प्राइम व्हिडीओवरुन गायब झालाय. १२३ तेलुगु मीडियाच्या रिपोर्टनुसार प्राइम व्हिडीओच्या अपकमिंग मूव्हीजच्या लिस्टमधून 'सिंघम अगेन' गायब झालाय. आता प्राइम व्हिडीओने बहुचर्चित 'सिंघम अगेन' अचानक हा हटवला? याविषयी प्राइम व्हिडीओच्या टीमचं कोणतंही अधिकृत वक्तव्य समोर आलं नाही.

'सिंघम अगेन' विषयी थोडंसं

दरम्यान 'सिंघम अगेन' प्राइम व्हिडीओने अचानक काढून टाकल्याने चाहत्यांची चांगलीच निराशा झालीय. ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि लागून येणारा वीकेंडमध्ये अनेकांनी घरबसल्या सहकुटुंब 'सिंघम अगेन' बघण्याचा प्लान केला असेल. परंतु प्राइम व्हिडीओने 'सिंघम अगेन' हटवल्याने चाहत्यांची घोर निराशा झालीय. दरम्यान 'सिंघम अगेन' दिवाळीच्या मुहुर्तावर २ नोव्हेंबरला रिलीज झाला होता. समोर कार्तिक आर्यनच्या 'भूल भूलैय्या ३'शी टक्कर असल्याने 'सिंघम अगेन'ने अपेक्षेपेक्षा कमीच कमाई केली.

Web Title: singham again movie ott amazon prime removes singham again ajay devgn ranveer singh akshay kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.