बॉलिवूड कलाकारांच्या गर्दीत चमकला मराठी चेहरा! 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये झळकला 'हा' अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 03:52 PM2024-10-07T15:52:37+5:302024-10-07T15:54:18+5:30

'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये दीपिका पादुकोण दिसला लोकप्रिय मराठी अभिनेता. तुम्ही ओळखलं? (deepika padukone, singham again)

singham again trailer marathi actor ankit mohan will be seen with deepika padukone | बॉलिवूड कलाकारांच्या गर्दीत चमकला मराठी चेहरा! 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये झळकला 'हा' अभिनेता

बॉलिवूड कलाकारांच्या गर्दीत चमकला मराठी चेहरा! 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये झळकला 'हा' अभिनेता

'सिंघम अगेन' या सिनेमाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर आज रिलीज झाला. अल्पावधीतच हा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल झालाय. दिग्गज कलाकारांची फौज या सिनेमात दिसतोय. अजय देवगणच्या 'सिंघम' सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. यानिमित्ताने लोकप्रिय कलाकारांची फौज 'सिंघम अगेन'मध्ये पाहायला मिळतेय. 'सिंघम अगेन' सिनेमात दिग्गज बॉलिवूड कलाकारांच्या गर्दीत एक मराठी अभिनेता लक्ष वेधून घेतोय. या अभिनेत्याचे  दीपिका पदुकोणसोबतचे काही सीन ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहेत.

'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये दिसला हा अभिनेता

'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये मराठमोळा अभिनेता अंकित मोहन झळकलाय. अंकित मोहनचे 'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये दीपिका पदुकोणसोबत एक-दोन प्रसंग असलेले दिसून येतात. अंकित मोहन सिनेमात गुंडाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता दिसत आहे. बॉलिवूड कलाकारांच्या गर्दीत मराठमोळ्या अंकितला पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसलाय. अंकितला 'सिंघम अगेन'सारख्या बिग बजेट सिनेमात काम करण्याची संधी मिळाल्याने तो नक्कीच खूश असेल यात शंका नाही. अंकितला आपण 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'पावनखिंड' अशा सिनेमांमध्ये अभिनय करताना पाहिलंय.

'सिंघम अगेन'कधी रिलीज होणार?

रोहित शेट्टीच्या बहुप्रतिक्षित 'सिंघम अगेन' (Singham Again) सिनेमाचा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये हा ट्रेलर लॉंच करण्यात आला. ४ मिनिट ४५ सेकंद इतक्या लांबाची हा ट्रेलर हिंदी सिनेमाच्या इतिहासातला पहिलाच ट्रेलर आहे. सिंघम अगेनमध्ये सिनेमात अजय देवगण, रणवीर सिंह, करीना कपूर, दीपिका पदुकोण, टायगर श्रॉफ, जॅकी श्रॉफ आणि अर्जुन कपूर यांची भूमिका आहे. तर अक्षय कुमारचा कॅमिओ आहे. १ नोव्हेंबर २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.

Web Title: singham again trailer marathi actor ankit mohan will be seen with deepika padukone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.