...या आहेत बॉलिवूडच्या सिंगल मदर !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2018 10:35 AM2018-05-11T10:35:24+5:302018-05-11T16:11:35+5:30

ग्लॅमरसच्या दुनियेत स्वत:ला सिद्ध करण्याच्या धडपडीत सिंगल मदर होऊन जगणे म्हणावे तेवढे नक्कीच सोपे नाही. इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ...

This is the single mother of Bollywood! | ...या आहेत बॉलिवूडच्या सिंगल मदर !

...या आहेत बॉलिवूडच्या सिंगल मदर !

googlenewsNext
ong>ग्लॅमरसच्या दुनियेत स्वत:ला सिद्ध करण्याच्या धडपडीत सिंगल मदर होऊन जगणे म्हणावे तेवढे नक्कीच सोपे नाही. इंडस्ट्रीतील स्वत:चे स्थान अबाधित ठेवताना मुलांचा सांभाळ करणे एखाद्या कसोटीप्रमाणे असते. अशाच काही बॉलिवूडमधील सिंगल मदरचा संघर्ष आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांनी स्वत: कष्ट सहन करून आपल्या मुलांना चांगले जीवन देणे हेच आपल्या आयुष्यातील प्राधान्य समजले आहे. 



सुष्मिता सेन
माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री सुष्मिता सेन ही अविवाहित आहे. मात्र तिने दोन अनाथ मुलींना दत्तक घेऊन त्यांना चांगले आयुष्य देणे हाच आपल्या जीवनातील प्राधान्यक्रम ठरविला आहे. एक आई म्हणून ती सर्व जबाबदाºया पार पाडत आहे. मुलींच्या पालनपोषणासाठी तिने आपल्या फिल्मी करिअरकडेदेखील दुर्लक्ष केले आहे. आज तिच्या आयुष्यात मुली याच प्राथमिकता आहेत. 



करिश्मा कपूर
नवºयाशी घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री करिश्मा कपूर आपल्या मुलांचा सांभाळ करण्यात कुठलीच कसर सोडताना दिसत नाही. ती सिंगल मदर बनून मुलांच्या शिक्षणापासून ते त्यांच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असताना दिसते. सध्या करिश्माची दोन्ही मुले शिक्षण घेत आहेत. 



पूजा बेदी
अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट पूजा बेदी सिंगल मदर असून, आपल्या मुलांचे पालनपोषण करण्यात ती कुठलाच कसूर ठेवत नाही. पूजाने फरहान इब्राहिमशी लग्न केले होते. मात्र काही मतभेदांमुळे हे दोघे विभक्त झाले. घटस्फोटानंतर पूजाने आपल्या मुलांची जबाबदारी स्वीकारली. आता ती एकटीच मुलगा आणि मुलींचा सांभाळ करीत आहे. 



हनी ईरानी
अभिनेत्री हनी ईरानी यांनी प्रसिद्ध कवी आणि गीतकार जावेद अख्तर यांच्याशी विवाह केला होता. मात्र त्यांच्यातील अंतर्गत कलह वाढत गेल्याने या दोघांनी एकमेकांशी घटस्फोट घेतला. या दोघांना जोया आणि फरहान अख्तर नावाची दोन मुले आहेत. घटस्फोटानंतर हनी ईरानी यांनी दोन्ही मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. फरहान आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. 



कोंकणा सेन
बॉलिवूडमधील सिंगल मदरपैकी एक असलेली कोंकणा सेन ही नेहमीच तिच्या मातृत्वामुळे चर्चेत असते. कारण तिने आपल्या मुलाच्या पालनपोषणासाठी इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. रणवीर शौरी याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर कोंकणाने आपल्या मुलाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली. आज ती सिंगल मदर म्हणून जगत असताना आईचे सर्व कर्तव्य पार पाडताना दिसत आहे. 



अमृता सिंग
अभिनेता सैफ अली खान याच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अमृता सिंगने आपल्या दोन्ही मुलांची जबाबदारी अतिशय समर्थपणे पार पाडली. अमृताची मुलगी सारा अली खान लवकरच ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. अमृताने हतबल न होता आपल्या मुलांना इंडस्ट्रीत स्वत:ला सिद्ध करण्याच्या लायक बनविले असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. 

Web Title: This is the single mother of Bollywood!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.