‘थप्पड’ प्रकरणात गोविंदाला पाच लाख भरून मागावी लागली बिनशर्त माफी!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2017 03:23 PM2017-07-12T15:23:08+5:302017-07-12T20:59:39+5:30

नऊ वर्षांपूर्वी चाहत्याच्या कानाखाली मारल्याप्रकरणात अभिनेता गोविंदाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. १६ जानेवारी २००८ रोजी गोविंदाने संतोष राय नावाच्या ...

In the 'slap' case, Govinda was asked to fill five lakhs unconditional apology! | ‘थप्पड’ प्रकरणात गोविंदाला पाच लाख भरून मागावी लागली बिनशर्त माफी!

‘थप्पड’ प्रकरणात गोविंदाला पाच लाख भरून मागावी लागली बिनशर्त माफी!

googlenewsNext
वर्षांपूर्वी चाहत्याच्या कानाखाली मारल्याप्रकरणात अभिनेता गोविंदाला न्यायालयाने दिलासा दिला आहे. १६ जानेवारी २००८ रोजी गोविंदाने संतोष राय नावाच्या एका तरुणाला चित्रपटाच्या सेटवरच कानाखाली मारली होती. त्यावेळी गोविंदा माध्यमांना मुलाखत देत होता. त्यानंतर या तरुणाने थेट सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तरुणाच्या तक्रारीनंतर न्यायालयाने गोविंदाला कायदेशीर नोटीस बजावली होती. या नोटीसनंतर हे प्रकरण बराच काळ रेंगाळले.

दरम्यान, आता याप्रकरणी निर्णय आला असून, गोविंदाच्या बाजूने निर्णय देण्यात आला आहे. मात्र हा निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले की, गोविंदाने कुठल्याही प्रकारची अट न ठेवता त्या तरुणाची सशर्त माफी मागावी. या निर्णयानंतर लगेचच गोविंदाने न्यायालयात माफीनामा सादर केला असून, न्यायालयाने त्यास मंजुरी दिली आहे. गोविंदाच्या माफीनामा प्राप्त होताच हे प्रकरण बंद करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतल्याचे समजते. 

मात्र गोविंदा संतोषची केवळ माफीच मागणार नसून, त्याला ५ लाख रुपयांची नुकसानभरपाईही देणार आहे. वास्तविक गेल्या सुनवाईलाच न्यायालयाने आदेश देताना दोघांनाही आपसात प्रकरण मिटविण्याचा सल्ला दिला होता. यावेळी न्यायालयाने गोविंदाला फटकारलेही होते. ‘तू हिरो आहेस, कोणालाही तू कसे काय मारू शकतोस? तुझे चित्रपट आम्ही बघतो, एन्जॉय करतो. परंतु तू कोणालाही अशाप्रकारे मारत असशील तर ते सहनशीलतेपलीकडील आहे. जर तू मोठा हिरो असशील तर तुझे मनही मोठे असायला हवे. रील लाइफ आणि रिअल लाइफमधील फरक समजून घे. तुझ्यासारख्या अभिनेत्याकडून सर्वसामान्याला मारणे अजिबात शोभत नाही. अशा शब्दांमध्ये न्यायालयाने गोविंदाला समज दिली. 

यावेळी न्यायालयाने गोविंदाचा तो व्हिडीओदेखील बघितला ज्यामध्ये गोविंदा अतिशय रागाने त्या तरुणाला मारत होता. कोर्टाच्या आदेशानंतर गोविंदाने गेल्यावर्षी त्या तरुणाची कुठलीही अट न ठेवता माफी मागितली होती. मात्र यावेळी त्याने स्वत: माफी मागितली नव्हती तर वकिलांच्या माध्यमातून मागितली होती. 

Web Title: In the 'slap' case, Govinda was asked to fill five lakhs unconditional apology!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.