'स्लमडॉग मिलेनियर' फेम देव पटेल आता करणार 'हे' काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 16:27 IST2018-10-30T16:19:39+5:302018-10-30T16:27:52+5:30

देव पटेल अभिनयानंतर आता दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे.

'Slumdog Millionaire' Fame Dev Patel will do it now | 'स्लमडॉग मिलेनियर' फेम देव पटेल आता करणार 'हे' काम

'स्लमडॉग मिलेनियर' फेम देव पटेल आता करणार 'हे' काम

ठळक मुद्देअभिनयानंतर देव करणार दिग्दर्शनात पदार्पण'मंकी मॅन' सिनेमात देव करणार अभिनयदेखील

हॉलिवूड व बॉलिवूडमध्ये झळकलेला अभिनेता देव पटेलने 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटातील जमाल मलिकच्या भूमिकेतून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे फक्त देशभरातच नाही तर जगभरातून कौतूक केले. या चित्रपटाने ऑस्कर पुरस्कारावर आपली मोहोर उमटविली आहे. अल्पावधीतच त्याने बॉलिवूड व हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. आता अभिनयानंतर देव पटेल नवे पाऊल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. तो नेमका काय करणार आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. देव अभिनयानंतर आता दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. देवने ऑस्कर पुरस्कार विजेता 'स्लमडॉग मिलेनियर' चित्रपटात काम केलेले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देव पटेलच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला चित्रपट थरारपट असणार आहे. या सिनेमाचे नाव 'मंकी मॅन' असणार आहे.

'मंकी मॅन' सिनेमाची कथा एका मुलाभोवती फिरते. जो तुरूंगातून बाहेर येऊन कार्पोरेट जगात यशस्वी होतो. यावर आधारीत हा सिनेमा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन देव पटेल करणार आहे. त्यासोबत तो या चित्रपटात अभिनय करतानादेखील दिसणार आहे. देव पटेलने पॉल एंगवनावेला आणि जॉन कोली यांच्यासोबत 'मंकी मॅन'ची पटकथा लिहिली आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाचे शूटींग मुंबईत होणार आहे. देव पटेल आगामी  'द पर्सनल हिस्ट्री ऑफ डेविड कॉपरफील्ड' आणि 'होटल मुंबई' या चित्रपटात भूमिका साकारत आहे.
देव पटेलच्या आगामी सिनेमा 'मंकी मॅन'बद्दल जाणून घेण्यासाठी त्याचे चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत आणि त्याच्या या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत. 
 

Web Title: 'Slumdog Millionaire' Fame Dev Patel will do it now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.