स्लमडॉग मिलिनेयर फेम रुबीना अली नोकरीच्या शोधात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 11:11 AM2017-09-14T11:11:33+5:302017-09-14T16:41:33+5:30
स्लमडॉग मिलिनेयर या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी प्रेक्षकांच्या मनात आजही तो चित्रपट तितकाच ताजा आहे. या ...
स लमडॉग मिलिनेयर या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाले असले तरी प्रेक्षकांच्या मनात आजही तो चित्रपट तितकाच ताजा आहे. या चित्रपटातील सगळेच कलाकार प्रेक्षकांना चांगलेच भावले होते. या चित्रपटाने ऑस्करपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे हे कलाकार केवळ भारतातच नव्हे तर परदेशातही फेमस झाले होते.
स्लमडॉग मिलिनेयर या चित्रपटात आपल्याला काही बालकलाकार देखील पाहायला मिळाले होते. या चित्रपटात लतिकाच्या लहानपणीची भूमिका रुबीना अलीने साकारली होती. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. रुबीना ही एका झोपडपट्टीत राहाणारी सामान्य मुलगी होती. पण या चित्रपटाने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटात रुबिना केवळ सात वर्षांची होती. आता या चित्रपटाला दहा वर्षं लोटून गेले असून ती आता सतरा वर्षांची झाली आहे. रुबीना अली आता लोकांच्या विस्मृतीत गेली आहे. रुबिना आता काय करतेय हे देखील लोकांना माहीत नाहीये.
स्लमडॉग मिलिनेयर फेम रुबिना अनेक वर्षं वांद्रे येथील गरीब नगरमधील एका झोपडपट्टीत राहात होती. पण काही वर्षांपूर्वी वांद्र्यातील या झोपडपट्टीला आग लागली आणि या आगीत रुबिनाचे घर संपूर्णपणे जळून गेले. रुबिनाला घरच नसल्याने ती वांद्रे सोडून नालासोपारा येथे राहायला गेली. ती सध्या नालासोपारा येथेच राहात आहे. इतर मुलींप्रमाणे रुबिनाला देखील प्रसिद्ध अभिनेत्री बनायचे होते. पण तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. सध्या ती बीएच्या फर्स्ट इयरला आहे. तिची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असल्याने घर चालवण्यासाठी ती सध्या नोकरीच्या शोधात आहे. कोणतीही नोकरी छोटी नसते असे तिचे म्हणणे असल्याने ती कुठलीही नोकरी करायला तयार आहे. स्लमडॉग मिलिनेयर हा चित्रपट तिच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा होता. पण या चित्रपटाच्या संदर्भातील कोणत्याच आठवणी तिच्याकडे आज नाहीत. तिच्या घरात लागलेल्या आगीत या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेचे फोटो, तिचे पुरस्कार सगळेच जळून गेले.
रुबिना आज सेलिब्रिटी म्हणून नव्हे तर एका सामान्य मुलीप्रमाणे तिचे जीवन जगत आहे.
Also Read : ...या पाच भारतीयांनी कोरले ‘आॅस्कर’वर नाव