४८ वर्षांनंतर स्मिता पाटील यांच्या 'या' सिनेमाचा 'कान्स'मध्ये होणार प्रिमियर, अमिताभ आनंद व्यक्त करत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 12:02 PM2024-04-26T12:02:39+5:302024-04-26T12:04:51+5:30
स्मिता पाटील यांच्या एका सिनेमाचा ४८ वर्षांनी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रीमियर होणार आहे. त्यानिमित्त अमिताभ यांनी एक पोस्ट शेअर केलीय (smita patil, amitabh bachchan)
स्मिता पाटील या भारतीय मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय आणि आदरणीय नाव. आजही स्मिता पाटील यांचं नाव उच्चारताच समोर दिसतात ते म्हणजे त्यांचे बोलके डोळे आणि त्यांनी अभिनय केलेल्या उत्कृष्ट कलाकृती. स्मिता पाटील यांचे असंख्य सिनेमे चाहत्यांच्या स्मरणात आहेत. स्मिता यांच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे.. तब्बल ४८ वर्षांनी स्मिता यांच्या गाजलेल्या सिनेमाचा प्रिमियर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. यासाठी अमिताभ यांनी आनंद व्यक्त केलाय.
स्मिता पाटील यांच्या 'मंथन' सिनेमाचा कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रिमियर होणार आहे. या सिनेमात स्मिता पाटील यांची प्रमुख भूमिका होती. याशिवाय नसीरुद्दीन शाह, ओम पुरी हे दिग्गज कलाकार सुद्धा या सिनेमात झळकले होते. स्मिता यांचा 'मंथन' हा गाजलेल्या सिनेमांपैकी एक. या सिनेमासाठी गुजरातमधील तब्बल ५ लाख शेतकऱ्यांनी प्रत्येकी २ रुपयांची मदत केली होती.
T 4992 - So proud that Film Heritage Foundation will be at the Cannes Film Festival for the third year in a row with another world premiere of a remarkable restoration - Shyam Benegal's film "Manthan" that had compelling performances from an exceptional cast including Smita… pic.twitter.com/TBVb1QmQxj
— Amitabh Bachchan (@SrBachchan) April 25, 2024
अमिताभ बच्चन यांना ही गोष्ट कळताच त्यांनी ट्विटरवर आनंद व्यक्त केलाय. अमिताभ यांनी 'मंथन'चा पोस्टर शेअर करत लिहिलंय की, "फिल्म हेरिटेज फाउंडेशनला सलग तिसऱ्या वर्षी कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमा दाखवण्याची संधी मिळतेय ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये यंदा श्याम बेनेगल यांचा चित्रपट "मंथन"चा प्रीमियर होणार आहे. ज्यात स्मिता पाटील आणि इतर कलाकारांचा सुंदर अभिनय पाहायला मिळाला. फिल्म हेरिटेज फाऊंडेशन भारताच्या सर्वोत्तम चित्रपट वारशाचे जतन आणि हे चित्रपट जगासमोर प्रदर्शन करण्यासाठी करत असलेले कार्य आश्चर्यकारक आहे."