“मी त्याला म्हटलं होतं…” सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत स्मृती इराणींना अश्रू अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 10:12 AM2023-03-26T10:12:55+5:302023-03-26T10:15:23+5:30

Smriti  Irani, Sushant Singh Rajput : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची आठवण करून स्मृती इराणी भावुक झाल्या. सुशांतच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांनी ताबडतोब अभिनेता अमित साधला फोन केला होता...

smriti irani cries and recalls telling sushant singh rajput | “मी त्याला म्हटलं होतं…” सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत स्मृती इराणींना अश्रू अनावर

“मी त्याला म्हटलं होतं…” सुशांत सिंग राजपूतच्या आठवणीत स्मृती इराणींना अश्रू अनावर

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput ) १४ जून २०२० रोजी जगाला अलविदा म्हणत कायमचा निघून गेला. त्याच्या मृत्यूचा धक्का आणि ती जखम आजही ताजी आहे. आजही सुशांतचे चाहते त्याच्या आठवणीने व्याकूळ होतात. सुशांतचं कुटुंब आणि मित्र परिवार आजही या धक्क्यातून सावरून शकलेलं नाही. अलीकडे केंद्रीय मंत्री व अभिनेत्री स्मृती इराणी (Smriti  Irani) या सुद्धा सुशांतच्या आठवणीत हळव्या झाल्या. सुशांतबद्दल बोलताना त्यांना अश्रू अनावर झालेत.  नीलेश मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत  सुशांतबद्दल बोलताना त्या भावुक झाल्या.

काय म्हणाल्या स्मृती इराणी...
“ज्या दिवशी सुशांतचा मृत्यू झाला, तेव्हा मी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये होते. सुशांतच्या मृत्यूची बातमी ऐकून मला मोठा धक्का बसला होता. मी कॉन्फरन्समध्ये होते. पण मला सहन होत नव्हतं. मी म्हटलं, प्लीज कॉन्फरन्स थांबवा. त्याने मला फोन का केला नाही, तो मला एकदा तर फोन करू शकत होताच, असा एकच विचार माझ्या मनात सुरू होता.  मी त्याला म्हटलं होतं की कधी स्वतःचा जीव घेऊ नकोस,” असं स्मृती इराणी म्हणाल्या. हे सांगताना त्यांना अश्रू आवरता आले नाहीत. 
सुशांतला मी जवळून ओळखत होते. कारण आमचे सेट आजूबाजूला होते. मी त्याला सेटवर काम करताना बघितलं होतं. मी त्याला एकदा इफ्फीसाठीही बोलवलं होतं, असंही त्या म्हणाल्या.

पुढे त्या म्हणाल्या, “ सुशांतच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मी लगेच अमित साध देखील फोन केला. सुशांतच्या घटनेनंतर मी घाबरले होते की अमितही असं काही करेल. हाही मूर्खपणा करून बसेल, असं मला वाटलं होतं. तुम्ही बिझी नाही ना, असं अमितने मला विचारलं. मला काम होतं, पण तरिही तू बोल, असं मी त्याला म्हणाले. आम्ही दोघं दोन तास बोलत होतं. अमित साध व सुशांत हे दोघं जवळचे मित्र होते. 
 सुशांत सिंगच्या निधनानंतर स्मृती यांनी ट्विटरवर एक भावनिक पोस्टही शेअर केली होती. ज्यामध्ये “माझ्याकडे शब्द नाहीत, तू असं काय केलंस, हेच समजत नाहीये…” असं त्यांनी या पोस्टमध्ये लिहिलं होतं.

Web Title: smriti irani cries and recalls telling sushant singh rajput

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.