Smriti Irani : स्मृती इराणी यांनी शेअर केला तारुण्यातील फोटो, चाहत्यांसह सेलिब्रेटीही झाले चकित

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 05:04 PM2024-07-25T17:04:08+5:302024-07-25T17:06:09+5:30

स्मृती इराणींचा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 

Smriti Irani Shares old PIC Celebs Mouni Roy, Maniesh Paul React | Smriti Irani : स्मृती इराणी यांनी शेअर केला तारुण्यातील फोटो, चाहत्यांसह सेलिब्रेटीही झाले चकित

Smriti Irani : स्मृती इराणी यांनी शेअर केला तारुण्यातील फोटो, चाहत्यांसह सेलिब्रेटीही झाले चकित

Smriti Irani Shares Photo : भाजपच्या नेत्या स्मृती इराणी या कायम चर्चेत असतात. आज मंत्री असलेल्या स्मृती इराणी या एकेकाळी लोकप्रिय अभिनेत्री होत्या. एकता कपूरच्या 'क्योंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून 'तुलसी' म्हणून त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली.  पहिल्याच मालिकेने त्यांना प्रसिद्धीझोतात आणलं. आजही त्यांची प्रेक्षकांच्या मनातील छबी कायम आहे. स्मृती इराणी या सोशल मीडियावर फार सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नुकतंच त्यांनी एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याचा ग्लॅमरस अवतार पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. 

स्मृती यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या तारुण्यातील फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्या खूपच सुंदर दिसत आहे.  कॅप्शनमध्ये हार्ट इमोजी शेअर करत त्यांनी लिहिलं, 'सिंहावलोकन #wednesdaywisdom'. या फोटोवर  चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  चाहत्यांसह मनीष पॉल आणि मौनी रॉय सारख्या सेलिब्रिटींनी कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.  स्मृती इराणींचा हा फोटो सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. 


अभिनयात करिअर घडवल्यानंतर स्मृती इराणी आता राजकारणात सक्रिय आहेत. २००३ साली भाजपात प्रवेश करत त्यांनी त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. २००४ साली त्यांनी लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं होतं. परंतु, त्या पराभूत झाल्या. त्यानंतर २०१४च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल गांधींविरोधात अमेठीमधून त्यांनी निवडणूक लढवत विजय मिळवला होता.  पण, स्मृती २०२४ मध्ये आपली जागा वाचवू शकल्या नाहीत. त्यांचा काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मा यांनी १६७१९६ मतांनी पराभव केला.

Web Title: Smriti Irani Shares old PIC Celebs Mouni Roy, Maniesh Paul React

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.