स्मृती इराणी यांची आईसाठी भावूक पोस्ट, म्हणाल्या - 'आई आपल्याबरोबर किती...'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 18:10 IST2023-12-20T18:07:50+5:302023-12-20T18:10:09+5:30
स्मृती इराणी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात.

स्मृती इराणी यांची आईसाठी भावूक पोस्ट, म्हणाल्या - 'आई आपल्याबरोबर किती...'
अभिनेत्री आणि राजकारणी असा प्रवास असलेल्या स्मृती इराणी या कायमच चर्चेत असतात. स्मृती इराणी सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. नुकतेच स्मृती इराणी यांनी आपल्या आईसाठी एक खास पोस्ट केली आहे. यासोबतच त्यांनी आपल्या आईचा फोटोही शेअर केला आहे.
स्मृती इराणींनी एक भावनिक पोस्ट शेअर केली. त्या म्हणाल्या, 'आई.. तिचा फोटो पोस्ट करण्याचे माझ्याकडे कोणतेही विशेष कारण नाही. तु नेहमीच मला साधं राहायला शिकवलं. एका तरुण राष्ट्राचा भाग म्हणून आपल्याला वृद्ध पालक आहेत, या वस्तुस्थितीला सामोरे जावे लागेल. मी माझ्या महत्त्वकांक्षा आणि स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी आशावादीच आहेच. पण त्याचबरोबर मी अशा पालकांची काळजी घ्यायला तयार आहे'.
पुढे त्या म्हणाल्या, 'ज्यांनी त्यांचे पालकत्व फक्त जन्म देण्यापर्यंतच मर्यादीत ठेवले नाही. प्रत्येकवेळी आपण मुले आपल्या मूडनुसार वागतो. पण आपले पालक संयमपणा दाखवता. आपला सर्व हट्टीपणा सहन करतात. जसे की वाढलेलं जेवण न खाणे, रात्री बाहेर जाण्यास न विचारणे, चित्रपटांसाठी न विचारणे, एखाद्या ठिकाणी प्रवासासाठी जावेसे वाटणे. कारण वर्गातील कोणीतरी त्यांच्या पालकांबरोबर बाहेर जात असतो, आपल्या पालकांचा बजेट आहे की नाही, हा विचार न करता आवडती खेळणी विकत घेणे'.
ईराणी यांनी लिहले, 'सध्या हे वाचत असताना कदाचित या क्षणी तुम्ही आयुष्यातील बऱ्याच गोष्टींना सामोरे जात असाल. पण तुमच्या पालकांना हॅलो म्हणण्यासाठी थोडा वेळ काढा, त्यांच्याबरोबर गप्पा मारा. त्यांना सांगा की तुम्ही त्यांच्यावर तुमचं किती प्रेम आहे. कारण आपल्याकडे किती काळ ते असतील कुणास ठाऊक'. त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.