​स्मृती इराणी यांचे पती झुबिन इराणी आणि शाहरुख खान आहेत बालपणीचे मित्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2017 05:35 AM2017-05-08T05:35:31+5:302017-05-08T11:05:31+5:30

स्मृती इराणी यांनी क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत तुलसी ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे स्मृती ...

Smriti Irani's husband Zubin Irani and Shahrukh Khan are friends of childhood | ​स्मृती इराणी यांचे पती झुबिन इराणी आणि शाहरुख खान आहेत बालपणीचे मित्र

​स्मृती इराणी यांचे पती झुबिन इराणी आणि शाहरुख खान आहेत बालपणीचे मित्र

googlenewsNext
मृती इराणी यांनी क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत तुलसी ही भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे स्मृती इराणी हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. या मालिकेनंतरदेखील स्मृती यांनी अनेक हिट मालिका दिल्या. पण सध्या त्या राजकारणात व्यग्र असल्याने छोट्या पडद्यापासून दूर आहेत. 
स्मृती इराणी यांनी नुकतेच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंगला त्यांचे अकाऊंट सुरू केले आहे आणि या अकाऊंटवर त्या विविध फोटो शेअर करत असतात. त्यांनी अकाऊंट सुरू केल्यानंतर एकता कपूरने इन्स्टाग्रामवर त्यांचे स्वागत केले होते. एकता कपूरच्या अनेक मालिकांमध्ये स्मृती यांनी काम केले आहे. तेव्हापासून एकता कपूर आणि स्मृती इराणी यांची खूप चांगली मैत्री आहे.
स्मृती इराणी यांनी 2001 मध्ये झुबिन इराणीशी लग्न केले होते. झुबिन यांचे हे दुसरे लग्न असून त्यांना पहिल्या लग्नापासून एक मुलगी देखील आहे. झुबिनच्या मुलीचा फोटो इन्टाग्रामला पोस्ट करून  स्मृती यांनी लिहिले आहे की, संपूर्ण कुटुंबाच्या फोटोमध्ये कोणीतरी नाहीये आणि मी तिची खूप आठवण काढत आहे. यावर त्यांची मुलगी शॅनलीने मी लवकरच परतत असल्याचा संदेश तिच्या आईसाठी लिहिला आहे. पण या फोटोवर बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने देखील एक कमेंट केले आहे. त्याने त्यात म्हटले आहे की, माझ्या बालपणीच्या मित्राची म्हणजेच झुबिनची मुलगी आता किती मोठी झाली आहे आणि किती सुंदर दिसायला लागली आहे आणि यावेळी मी एक आठवण नक्की करून देईन की, तिचे शॅनली असे नाव मीच ठेवले आहे. 

Web Title: Smriti Irani's husband Zubin Irani and Shahrukh Khan are friends of childhood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.