दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या मुंबई रिसेप्शनचा होता हा मेनू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2018 04:33 PM2018-11-30T16:33:26+5:302018-11-30T16:38:17+5:30

मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये हे रिसेप्शन देण्यात आले होते. हे रिसेप्शन खास दीपिका आणि रणवीर यांच्या कुटुंबियांसाठी आणि मीडियासाठी आयोजित करण्यात आले होते.

A sneak peek into the lavish dessert served at Ranveer Singh and Deepika Padukone's Mumbai reception | दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या मुंबई रिसेप्शनचा होता हा मेनू

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या मुंबई रिसेप्शनचा होता हा मेनू

googlenewsNext
ठळक मुद्देया रिसेप्शनला खूप साऱ्या खाण्याचे पदार्थ ठेवण्यात आले होते. तसेच अनेक गोड पदार्थांची देखील रिसेप्शनला रेलचेल होती. प्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शनला खाण्यासाठी काय काय होते हे सगळ्यांनागाजरच्या हलव्यापासून, चॉकलेट, केक, रस मलाई, रसगुल्ला यांसारखे अनेक पदार्थ आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळत आहेत. 

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांच्या मुंबईतील रिसेप्शनची चर्चा अद्यापही थांबली नाही. रिसेप्शनमध्ये दीपवीर दोघेही  एकमेकांना मॅचिंग आऊटफिटमध्ये दिसलेत. दीपवीरचा रॉयल अंदाज चर्चेचा विषय ठरला. विशेषत: दीपिकाने तर सगळ्यांनाच घायाळ केलं. दीपिकाचा लूक हा एखादी अप्सरा अवतरली असाच होता. दीपिकाने अबु जानी आणि संदीप खोसलाने डिझाईन केलेला आऊटफिट कॅरी केला होता तर रणवीरने घातलेली शेरवानी डिझाईनर रोहित बलने डिझाईन केली होती. त्यांच्या या रिसेप्शनची चर्चा त्यांच्या कपड्यांमुळे रंगली आहे. पण त्याचसोबतच मुंबईतील रिसेप्शनला काय काय खायला होते याची देखील सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. 

मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये हे रिसेप्शन देण्यात आले होते. हे रिसेप्शन खास दीपिका आणि रणवीर यांच्या कुटुंबियांसाठी आणि मीडियासाठी आयोजित करण्यात आले होते. मीडियातील अनेक मंडळींनी त्यांच्या रिसेप्शनला जाऊन शुभेच्छा दिल्या. या रिसेप्शनला खूप साऱ्या खाण्याचे पदार्थ ठेवण्यात आले होते. तसेच अनेक गोड पदार्थांची देखील रिसेप्शनला रेलचेल होती. प्रसिद्ध फोटोग्राफर व्हायरल भयानीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून दीपिका आणि रणवीरच्या रिसेप्शनला खाण्यासाठी काय काय होते हे सगळ्यांना सांगितले आहे. गाजरच्या हलव्यापासून, चॉकलेट, केक, रस मलाई, रसगुल्ला यांसारखे अनेक पदार्थ आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळत आहेत. 

सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर १४ आणि १५ नोव्हेंबरला दीपवीर लग्नबंधनात अडकले. इटलीतील सुप्रसिद्ध लेक कोमो येथे दोघांनीही लग्नगाठ बांधली. यानंतर २१ नोव्हेंबरला बेंगळुरू येथे दोघांच्याही लग्नाचे पहिले रिसेप्शन झाले. यानंतर २८ नोव्हेंबरला मुंबईत दुसरे रिसेप्शन रंगले. या दोन्ही रिसेप्शनमध्ये केवळ दीपिका व रणवीर यांचे जवळचे नातेवाईक व मित्र परिवार हजर होता. आता येत्या १ डिसेंबरला दीपवीरच्या लग्नाचे तिसरे रिसेप्शन होणार आहे आणि हे रिसेप्शन खास बॉलिवूडमधील मित्र-मंडळींसाठी आयोजित केले जाणार आहे. त्यामुळे चाहत्यांचे लक्ष या रिसेप्शनकडे आणि यातील दीपवीरच्या लूककडे लागले आहे.
 

Web Title: A sneak peek into the lavish dessert served at Ranveer Singh and Deepika Padukone's Mumbai reception

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.