ऐश्वर्या रायची डुप्लिकेट सलमान खानची लकी आठवतेय ना..!, जाणून घ्या ती सध्या काय करते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2021 10:29 IST2021-12-18T08:00:00+5:302021-12-18T10:29:48+5:30
२००५ साली 'लकी नो टाईम फॉर लव्ह' चित्रपटातून अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

ऐश्वर्या रायची डुप्लिकेट सलमान खानची लकी आठवतेय ना..!, जाणून घ्या ती सध्या काय करते?
२००५ साली 'लकी नो टाईम फॉर लव्ह' चित्रपटातून अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात ती सलमान खानसोबत झळकली. . ही लकी गर्ल सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरीदेखील आजही ती प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे. तिचा निरागस चेहरा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. स्नेहा आज आपला 34 वा वाढदिवस साजरा करते आहे. तिच्या लुक्सची तुलना नेहमीच ऐश्वर्या राय बच्चनसोबत होते.
लकी सिनेमातून सलमाननेच तिला लॉन्च केले होते. सलमान खानची साथ लाभल्यानंतरही स्नेहा उलाल हवे तसे यश मिळाले नाही. अखेरची 2015 मध्ये आलेल्या 'बेजुबान इश्क' या सिनेमात झळकली होती. मात्र त्यानंतर सिनेइंडस्ट्रीतून अचानक गायब झाली.
याकाळात कोणालाच माहित नव्हते की ती कुठे गायब झाली आहे. मात्र नंतर तिने सांगितले की, ती एका गंभीर आजाराशी सामना करत होती. त्यामुळे तिला जास्त काळ उभे राहता येत नव्हते आणि चालतादेखील येत नव्हते. त्यामुळे तिला चित्रपटसृष्टीपासून दूर रहावे लागले होते.
स्नेहाने सांगितले, जेव्हा 'लकी' सिनेमा आला तेव्हा मी फक्त 18 वर्षांची होती. याच काळात सिनेमामुळे माझे शिक्षणही अपूर्ण राहिले होते.पण शूटिंग पूर्ण झाल्यानंतर मी शिक्षण पूर्ण केले. विशेष म्हणजे हिंदी सिनेमात काम करण्याआधी स्नेहा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत काम करत होती. बॉलिवूडमध्ये २०१५ साली 'बेजुबान इश्क' सिनेमात शेवटची झळकली होती. त्यानंतर ती सिनेसृष्टीपासून लांब गेली.