ऐश्वर्या राय बच्चनसह केलेली माझी तुलना हा निव्वळ पीआर स्टंट, स्नेहा उलालने सांगितले सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2020 03:19 PM2020-10-06T15:19:45+5:302020-10-06T15:25:40+5:30
दी सिनेमात काम करण्याआधी स्नेहा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत काम करत होती. बॉलिवूडमध्ये २०१५ साली 'बेजुबान इश्क' सिनेमात शेवटची झळकली होती.
२००५ साली 'लकी नो टाईम फॉर लव्ह' चित्रपटातून अभिनेत्री स्नेहा उल्लाल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात ती सलमान खानसोबत झळकली. ही लकी गर्ल सध्या बॉलिवूडपासून दूर असली तरीदेखील आजही ती प्रेक्षकांना चांगलीच लक्षात आहे. तिचा निरागस चेहरा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. तिच्या लुक्सची तुलना नेहमीच ऐश्वर्या राय बच्चनसोबत होते. लकी चित्रपटातून आपल्या सिनेकारकीर्दीला सुरूवात केल्यानंतर स्नेहा उलाल सिनेइंडस्ट्रीतून अचानक गायब झाली.
याकाळात कोणालाच माहित नव्हते की ती कुठे गायब झाली आहे. मात्र नंतर तिने सांगितले की, ती एका गंभीर आजाराशी सामना करत होती. त्यामुळे तिला जास्त काळ उभे राहता येत नव्हते आणि चालतादेखील येत नव्हते. त्यामुळे तिला चित्रपटसृष्टीपासून दूर रहावे लागले होते.
एक न्यूज एजेंसीला दिलेल्या मुलाखतीत स्नेहा उलालने सांगितले की, मी सध्याच्या परिस्थिती फिट आहे. मला त्याचाच जास्त आनंद आहे. जेव्हा मी या क्षेत्रात आले तेव्हा पीआर स्ट्रेटजीनुसार मी ऐश्वर्यासारखी दिसते असे भासवले गेले होते. पब्लिसिटी व्हावी म्हणून माझी तुलना ऐश्वर्यासह केली गेली. आजही मला ऐश्वर्याची डुप्लिकेटच समजतात.
मी ऐश्वर्याची खूप मोठी फॅन आहे, तिचे काम आणि इंडस्ट्रीमधील तिने दिलेल्या योगदानाचे कौतुक केले पाहिजे. मी तिच्यासारखी दिसते या तुलनेमुळे मी फार आनंदी होत नाही कारण शेवटी, प्रत्येकालाच स्वतःची ओळख हवी असते.ऐश्वर्या आणि माझ्या दिसण्यात थोडे फार साम्य आहे. आता मी तर माझा लुक बदलू शकत नाही. मी माझ्या कामासाठी आणि कर्तृत्वासाठी ओळखले जावे अशी माझी ईच्छा आहे.
असं बोललं जातं की, ऐश्वर्या राय बच्चनसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमानने स्नेहाचे लूक ऐश्वर्या सारखे असल्यामुळे तिला त्याच्या चित्रपटात काम केले होते. स्नेहाला सलमान जेव्हा भेटला होता. त्याच्या काही दिवसांपूर्वीच ऐश्वर्या आणि सलमानचे ब्रेकअप झाले होते.
विशेष म्हणजे हिंदी सिनेमात काम करण्याआधी स्नेहा दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत काम करत होती. बॉलिवूडमध्ये २०१५ साली 'बेजुबान इश्क' सिनेमात शेवटची झळकली होती. त्यानंतर ती सिनेसृष्टीपासून लांब गेली,