दोन लग्न करूनही एकटीच आयुष्य जगते ही अभिनेत्री, दोन्ही वेळा ठरली घरगुती हिंसाचाराची बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 06:00 IST2020-02-13T06:00:00+5:302020-02-13T06:00:00+5:30
स्नेहाचे एकदा नाही तर दोनदा लग्न केलं.मात्र दोन्ही लग्न फार काळ टिकली नाहीत.

दोन लग्न करूनही एकटीच आयुष्य जगते ही अभिनेत्री, दोन्ही वेळा ठरली घरगुती हिंसाचाराची बळी
अनेक कलाकारांची लग्न फार काळ टिकली नसल्याची उदाहरणं आहेत. काही ना काही खटके उडाल्यानंतर ही सेलिब्रिटी मंडळी आपल्या जोडीदारापासून वेगळे झाले आहेत. अशाच लग्न फार काळ न टिकलेल्या सेलिब्रिटींमध्ये आणखी एका मराठी अभिनेत्रीचं नाव घेतले जाते ते म्हणजे अभिनेत्री स्नेहा वाघचं. स्नेहाचे एकदा नाही तर दोनदा लग्न केलं.मात्र दोन्ही लग्न फार काळ टिकली नाहीत. अनुराग सोलंकी या इंटिरिअर डिझायनरसह स्नेहा दुस-यांदा रेशीमगाठीत अडकली होती. मात्र दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. अवघ्या ८ महिन्यांतच दोघांत बेबनाव झाला आणि ते वेगळे राहू लागले.
स्नेहाच्या पहिल्या लग्नाबाबतही असंच काहीसं घडलं होतं. वयाच्या १९व्या वर्षी स्नेहाचे पहिले लग्न झाले होते. त्या लग्नानंतरही तिला घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागला होता. त्यावेळी सारं काही जवळपास ७ वर्ष सहन केल्याचं तिने सांगितले आहे. या सा-याने परिसीमा गाठल्यानंतर तिने त्या नात्यातून बाहेर येण्याचा निर्णय घेतला. मात्र दुर्दैवानं स्नेहाचं दुसरं लग्नसुद्धा ८ महिन्यांपेक्षा जास्त टिकू शकलं नाही. या सगळ्या काळात आपण भेदरल्याचे तसंच खचून गेल्याचंही स्नेहाने नमूद केले होते.
पुरुषांना त्यांच्यापेक्षा जास्त यशस्वी स्त्रिया आवडत नाही. मला असे जाणवले की मी या व्यक्तीसोबत माझे संपूर्ण आयुष्य काढू शकत नाही. मी नेहमीच माझ्या विचारांवर आणि कृतींवर ठाम राहिलेली आहे. त्यामुळे मी लोक काय म्हणतील यापेक्षा मला काय करायचे आहे आणि कसे जगायचे आहे या गोष्टीलाच जास्त महत्त्व देत असल्याचेही स्नेहाने सांगिले होते.