तर काय सोनमने आनंद अहुजासोबतच्या नात्याची दिली कबुली?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2017 11:34 AM2017-01-02T11:34:04+5:302017-01-02T11:38:05+5:30
Sonam Kapoor just made her relationship official with Anand Ahuja with this Insta post : Sonam Kapoor : आनंद अहुजाबद्दल सोनम कपूर बरीच सीरिअस असल्याचे मानले जातेय. आता तर सोनमने आनंदसोबतचे रिलेशन जणू अधिकृतपणे मान्यच केले आहे.
स नम कपूर आणि आनंद अहुजा या दोघांच्या रिलेशनशिपच्या बातम्या सध्या बºयाच चर्चेत आहेत. कुठलेही फॅमिली फंक्शन असो वा हॉलिडे सोनम अलीकडे कुठेही एकटी दिसत नाही. तिच्यासोबत आनंद अहुजा असतोच असतो. सोनम व आनंद अहुजा यांच्या रिलेशनशिपच्या बातम्या चर्चेत येण्यामागे हेच कारण आहे.
अलीकडे सोनम अगदी बिनधास्त आनंदसोबत वावरताना दिसते. आनंदसोबत कुणी आपल्याला क्लिक करेल, याची कुठलीही भीती न बाळगता सोनम अगदी बिनधास्त त्याच्यासोबत एन्जॉय करतेय. त्यामुळेच आनंद अहुजाबद्दल सोनम बरीच सीरिअस असल्याचे मानले जातेय. आता तर सोनमने आनंदसोबतचे रिलेशन जणू अधिकृतपणे मान्यच केले आहे. होय, सोनमने आपल्या चाहत्यांना ज्याप्रकारे नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या त्यावरून तरी असेच वाटतेय. आपल्या चाहत्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना सोनमने आनंदचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. आता स्वत:सोबत आनंदचा फोटो सोशल मीडियावर शेअर करणे, याचा अर्थ तुम्ही चांगलाच समजू शकता. सोनमने या फोटोला दिलेले कॅप्शन आहे, Happy new year folks! #keepitreal.
आता या कॅप्शनवरून तरी आपण सोनमच्या मनातील आपण नक्कीच ओळखू शकतो. सोनमला कुठलीच लपवाछपवी आवडत नाही. कदाचित आनंद व तिच्या रिलेशनशिपबद्दलदेखील तिला कुठलीच लपवाछपवी करायची नाहीय. एकंदर काय तर सोनमला सगळे काही ‘रिअल’ ठेवायचे आहे.
काही दिवसांपूर्वी सोनम व आनंद लवकरच लग्न करणार आहेत अशा बातम्या आल्या होत्या. यावर सोनम जाम भडकली होती. आर यू मॅड? माझ्या पर्सनल लाईफवर लक्ष न देता लोकांनी माझ्या करिअरबद्दल चर्चा करायला हवी,अशा शब्दांत तिने सगळ्यांना सुनावले होते. पण आताश: सोनमला कदाचित सुबुद्धी झाली असावी. कितीही लपवले तरी लपायचे नाही आणि मुळात लपवायचे कशाला? सोनम तुला लवकरच कळले. आॅल दी बेस्ट!!