म्हणून करण जोहरने सोशल मीडियावर मागितली बिग बींची माफी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2017 08:53 AM2017-12-30T08:53:32+5:302017-12-30T14:24:17+5:30

बॉलिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन ट्विरवर नेहमीच अॅक्टीव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपले विचार नेहमी रसिकांसमोर मांडत असतात. मात्र ...

So Karan Johar asked on social media for Big B's apology | म्हणून करण जोहरने सोशल मीडियावर मागितली बिग बींची माफी

म्हणून करण जोहरने सोशल मीडियावर मागितली बिग बींची माफी

googlenewsNext
लिवूडचे बादशाह अमिताभ बच्चन ट्विरवर नेहमीच अॅक्टीव्ह असतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आपले विचार नेहमी रसिकांसमोर मांडत असतात. मात्र सध्या ते दिग्दर्शक-निर्माता करण जोहरवर काहीसे नाराज असल्याचे दिसते आहे. करण जोहरने बिग बींची नाराजगी दूर करण्यासाठी माफी देखील मागितली आहे. त्याचे झाले असे की, रमेश सिप्पी आणि करण जोहर एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यावेळी चर्चा सुरु असताना करणने एक खुलासा केला. जो अमिताभ बच्चन यांना आवडला नाही. करण म्हणाला बॉलिवूडवर असलेले उत्तर भारतीय आणि पंजाबी संस्कृतीचा पगडा पाहून करणने सुरुवातीला काही अंदाज बांधले होते. करण म्हणाला की, ''सुरुवातीला मला असं वाटत होतं की, इथं सगळेच जण पंजाबीच आहेत. कारण, माझे बाबा सगळ्यांशी पंजाबीत बोलायचे. करण ऐवढ्यावरच थांबला नाही अमिताभ बच्चन यांचे उदारहण देत तो म्हणाला,  बिग बीसुद्धा मुळचे पंजाबी नसताना ती हे भाषा अगदी चांगल्या पद्धतीने बोलतात. 



करणच्या या वक्तव्याचा बिग बींनी चांगलाचा समाचार घेतला. करणच्या या वक्तव्याला उत्तर देताना अमितजींने ट्वीट केले की. करण मी पंजाबी भाषा यामुळे बोलतो कारण माझी आई शीख होती. त्यामुळे मला पंजाबी भाषा ही बोलता येते. बिग बींचे हे ट्वीट बघून करण जोहने लगेच आपल्या वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. होय, अमिक अंकल, मला माफ करा. असे ट्वीट करणने केले आहे. 



करण जोहरच्या 'कभी खुशी कभी गम', 'कभी अलविदा ना कहना' या चित्रपटात बिग बींनी करण सोबत काम केले आहे. 2018मध्ये येणाऱ्या करणच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाचाही अमिताभ बच्चन भाग आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहे.  हा चित्रपट तीन भागांमध्ये रिलीज करण्यात येणार आहे. याचा पहिला भाग  १५ ऑगस्ट २०१९ ला रिलीज केला जाणार आहे. बिग बींनसोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांची सुद्धा या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. 

ALSO READ :  करण जोहरला त्याने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांपेक्षाही आवडतो हा चित्रपट

Web Title: So Karan Johar asked on social media for Big B's apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.