म्हणून कॅटरिना कैफने नाकारला हा चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 11:24 AM2017-12-29T11:24:49+5:302017-12-29T17:11:52+5:30

आम्ही तुम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितले होते की बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरच्या चित्रपट कॅटरिना कैफ झळकणार आहे. बत्तू गुल ...

So Katrina Kaif denied this film | म्हणून कॅटरिना कैफने नाकारला हा चित्रपट

म्हणून कॅटरिना कैफने नाकारला हा चित्रपट

googlenewsNext
्ही तुम्हाला काही दिवसांपूर्वी सांगितले होते की बॉलिवूडचा चॉकलेट बॉय शाहिद कपूरच्या चित्रपट कॅटरिना कैफ झळकणार आहे. बत्तू गुल मीटर चालू या चित्रपटात ती मुख्य भूमिका साकारताना दिसणार होती. मिळालेल्या माहितीनुसार कॅटरिनाने या चित्रपटात काम करण्यास नकार दिला आहे.  दिग्दर्शक श्रीनारायण सिंग यांनी कॅटरिना कैफला चित्रपटाची स्क्रिप्ट ऐकविली होती. ती तिला आवडली सुद्धा होती. मात्र डेट्स न होऊ शकल्यामुळे तिला या प्रोजेक्टमधून बाहेर पडावे लागले.  

मिड-डे-च्या रिपोर्टनुसार चित्रपटात अभिनेत्याच्या भूमिकेला जास्त महत्त्व होते. या चित्रपटातील अभिनेत्रीला एका वेगळ्या एक्सेंटमध्ये बोलायचे आहे कारण हा चित्रपट उत्तराखंडमध्ये चित्रित केला जाणार आहे. जर कॅटरिना कैफने ही भूमिका केली असती तर तिला देसी अंदाजात दिसावे लागले असते तसेच उच्चारणसुद्धा शिकावं लागले असते. या भूमिका साकारण्यासाठी कॅटला थोडी मेहनत घ्यावी लागली असती. सध्या ती आनंद एल. राय यांच्या चित्रपटात आणि आमिर खानच्या ठग्स ऑफ हिंदोस्तानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. त्यामुळे शाहिद चित्रपटात काम करण्यास तिने नकार दिला.   
चित्रपटाची निर्माती प्रेरणा अरोराने सांगितले की, आम्ही या चित्रपटासाठी कॅटरिना अप्रोच केला होता कारण या भूमिकेसाठी ती आमची पहिली पसंती होती. तिला चित्रपटातील तिची भूमिका आवडली होती. मात्र आमच्या शूटिंगच्या तारखांमध्ये कैल्श होत होते. या चित्रपटाची शूटिंग जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात होणार आहे आणि कॅटरिना मार्चपर्यंत फ्रि नाही आहे.  शाहिद कपूर या चित्रपटात वकिलाची भूमिका साकारणार आहे. तसेच चित्रपटात अभिषेक बच्चन यांच्यादेखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. शाहिद कपूरचा पद्मावती चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटासाठी शाहिदने प्रचंड मेहनत घेतली आहे. यातील राजा रतन सिंहच्या भूमिकेसाठी सहा प्रकारच्या तलवार बाजीचे प्रशिक्षण घेतले आहे. यात शाहिद सह दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगची देखील महत्त्वाची भूमिका आहे. करणानी सेनेने आणि इतिहासकारांनी या चित्रपटाच्या रिलीजला विरोध केला आहे.   

Web Title: So Katrina Kaif denied this film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.