तर माझी पत्नी मला सोडून गेली असती: आयुष्मान खुराना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 09:47 AM2018-04-03T09:47:14+5:302018-04-03T15:17:14+5:30

आयुष्मान खुरानाने संगीत आणि चित्रपट दोन्ही श्रेत्रात यश मिळवले आहे. सध्या तो फिल्मफेयर मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसतो आहे. याच ...

So my wife would have left me: Ayushman Khurana | तर माझी पत्नी मला सोडून गेली असती: आयुष्मान खुराना

तर माझी पत्नी मला सोडून गेली असती: आयुष्मान खुराना

googlenewsNext
ुष्मान खुरानाने संगीत आणि चित्रपट दोन्ही श्रेत्रात यश मिळवले आहे. सध्या तो फिल्मफेयर मॅगझीनच्या कव्हर पेजवर दिसतो आहे. याच दरम्यान त्यांने आपल्या पत्नीशी संबंधीत एक गुपित उघडं केले. 

आयुष्मान म्हणाला की माझे जर सगळं चित्रपट हिट गेले असते तर माझी पत्नी मला सोडून गेली असती. आयुष्मानचा इशारा विकी डोनर चित्रपटाकडे होता. विकी डोनर चित्रपटाच्या यशानंतर त्याला कुटुंबाला देण्यासाठी वेळ नव्हता. यशाच्या नशेमध्ये तो होता. मात्र लवकरच त्याने स्वत: ला ट्रेकवर आणले. आयुष्यमान म्हणाला मी पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमध्ये समतोल करायला शिकलो. पत्नीने त्याला चांगल्या आणि वाईट दोन्ही दिवसात साथ दिल्याचे तो आवर्जून सांगतो. आयुष्यमानच्या फॅन फॉलोईंगमध्ये तरुणींची संख्या जास्त आहे. त्यामुळे सुरुवातीला त्याची पत्नी नाराज व्हायची. मात्र त्यानंतर तिनेही ही गोष्ट स्वीकारली. 

आयुष्मानने बॉलिवूडमध्ये एंट्री 2012 साली आलेल्या विकी डोनर चित्रपटातून केली. या चित्रपटात तो यामी गौतम सोबत दिसला होता. आयुष्मान एक चांगला अभिनेता होण्याबरोबरच एक दमदार गायकसुद्धा आहे. 'शुभ मंगल सावधान आणि बरेली की बर्फी सारखे चांगले चित्रपट दिल्यानंतर आता आयुष्यमान खुराना फॅमिली ड्रामामध्ये दिसणार आहे. दिग्दर्शक अमित शर्माच्या 'बधाई हो'चे पहिल्या टप्प्याचे शूटिंग पूर्ण झाले आहे. या चित्रपटात आयुष्मानची अभिनेत्री अमित खानबरोबर आपला पहिला चित्रपट करणारी अभिनेत्री सान्या मल्होत्रा असणार आहे. 

‘बधाई हो’  हा एक फॅमिली ड्रामा आहे. या कुटुंबाला अचानक एक बातमी मिळते आणि या बातमीने अख्खे कुटुंब तणावात येतात. सगळे जण आपआपल्यापरिने ही समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू लागतात,अशी या चित्रपटाची कथा आहे. अमित शर्मा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. अमितने जवळपास १ हजारांवर जाहिरातींचे दिग्दर्शन केले आहे. २०१५ मध्ये आलेला अर्जुन कपूर व सोनाक्षी सिन्हाचा ‘तेवर’ हा चित्रपट अमित शर्माने दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये डायरेक्शन डेब्यू केला होता.

Web Title: So my wife would have left me: Ayushman Khurana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.