​म्हणून नाना पाटेकरने संजय दत्त सोबत काम करण्यास दिला नकार!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2017 06:14 PM2017-01-04T18:14:03+5:302017-01-04T18:14:03+5:30

बॉलिवूडच्या दिग्गज कलावंतांत सामील असलेला नाना पाटेकर हा आपल्या अभिनयासोबतच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखला हातो. विषय कोणताही असो, नाना ...

So Nana Patekar refused to work with Sanjay Dutt! | ​म्हणून नाना पाटेकरने संजय दत्त सोबत काम करण्यास दिला नकार!

​म्हणून नाना पाटेकरने संजय दत्त सोबत काम करण्यास दिला नकार!

googlenewsNext
ong>बॉलिवूडच्या दिग्गज कलावंतांत सामील असलेला नाना पाटेकर हा आपल्या अभिनयासोबतच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी देखील ओळखला हातो. विषय कोणताही असो, नाना आपले मत स्पष्टपणे मांडण्यावर विश्वास ठेवतो. पडदा असो किंवा त्याचे वास्तविक जीवन असो तो आपले आदर्श सोडत नाही. नानाचे जीवन आश्चर्यकारक आहे. नानाच्या जीवनातील एक गोष्ट अभिनेता संजय दत्त याच्याशी संबंधित असल्याने नाना पाटेकरने त्याच्यासोबत काम करण्यास नकार दिला आहे. ही गोष्ट तुम्हालाही जाणून घ्यायची आहे ना! 

नाना पाटेकरने अभिनेता संजय दत्तसोबत काम केले नाही आणि भविष्यातही तो त्याच्यासोबत काम करू इच्छित नाही. यामागचे कारण तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. संजय दत्त सोबत काम न करण्यासाठी नानाचा एक विचार आहे. संजय दत्तला १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटात गुन्हेगार ठरविण्यात आले होते. यासाठी त्याला कारावासही झाला आहे, मात्र याच कारणासाठी तो संजय दत्त सोबत काम करू इच्छित नाही. 

nana patekar dont want to work with sanjay dutt

नाना पाटेकरच्या मतानुसार, मी संजय दत्तसोबत आपल्या जीवनात कधीच काम केले नाही आणि भविष्यातही मी काम करणार नाही. १९९३ साली जे झाले त्याचे मला फार दु:ख आहे. मी वरळी बेस्ट ब्लास्टमध्ये आपल्या भावाला गमाविले आहे. माझ्या बायकोचा मृत्यू देखील त्याच स्फोटात झाला असता, जर ती दुसºया बसमध्ये चढली नसती. नाना म्हणाला, मी यासाठी संजय दत्तला जबाबदार धरत नाही, मात्र त्याचा या घटनेत थोडा देखील सहभाग असेल तर मी त्याच्यासोबत काम करणार नाही. मी हा निर्णय त्या लोकांसाठी घेतला आहे, ज्यांनी आपले प्राण त्या घटनेत गमाविले आहेत. 

नाना पाटेकर सामाजिक कार्यात सक्रिय आहे. साधी राहणी हे देखील त्याचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणता येईल. बॉलिवूडमध्ये पाकिस्तानी कलावंतांवर बॅन असावा याचे त्याचे समर्थन केले आहे. यासोबतच दुष्काळाच्या विषयावर २०१६ साली महाराष्ट्र सरकारचा विरोधही त्यांने केले आहे. 

Web Title: So Nana Patekar refused to work with Sanjay Dutt!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.