So Romantic !! ​अखेर विराट कोहलीने दिली अनुष्कावरच्या प्रेमाची कबुली!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2017 09:59 AM2017-02-15T09:59:12+5:302017-02-15T15:29:12+5:30

क्रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत विराट कोहली आणि बॉलिवूड प्रेमींच्या ‘दिलाची धडकन’ अनुष्का शर्मा यांची लव्हस्टोरी आज अखेर जगजाहिर झाली, असे म्हणायला काहीही हरकत नाही.

So Romantic !! Virat Kohli finally admits his love affair! | So Romantic !! ​अखेर विराट कोहलीने दिली अनुष्कावरच्या प्रेमाची कबुली!

So Romantic !! ​अखेर विराट कोहलीने दिली अनुष्कावरच्या प्रेमाची कबुली!

googlenewsNext
रिकेटप्रेमींच्या गळ्यातील ताईत विराट कोहली आणि बॉलिवूड प्रेमींच्या ‘दिलाची धडकन’ अनुष्का शर्मा यांची लव्हस्टोरी आज अखेर जगजाहिर झाली, असे म्हणायला काहीही हरकत नाही. होय, आता विराटने स्वत:च अनुष्काबद्दलचे प्रेम जाहिर केल्यावर प्रश्नच नाही. विश्वास बसत नसेल तर विराटने व्हॅलेन्टाईन डेच्या दुस-यादिवशी म्हणजेच आज लिहिलेली पोस्ट तुम्हाला वाचायलाच हवी. या पोस्टमध्ये विराटने आपल्या प्रेमाची थेट कबुली दिली आहे. ती सुद्धा काहीशा शायराने अंदाजात.



खरे तर विराट व अनुष्काचे नाते कुणापासूनही लपून राहिलेले नाही. कधी हॉली डे, कधी एकत्र विमानतळावर तर कधी कुण्या पार्टीत दोघेही अनेकदा हातात हात घालून दिसलेत. केवळ इतकेच नाही तर क्रिकेटच्या मैदानावरही अनुष्का व विराट यांच्या बहरत्या प्रेमाची प्रचिती आली. अर्थात तरीही दोघांनी याबद्दल सुरक्षित मौन बाळगणेच पसंत केले होते. पण अखेर मनातली गोष्ट ओठांवर आलीच आणि विराटने त्याचे अनुष्कावरचे प्रेम खुलेआम बोलून दाखवले. यासाठी त्याने खास व्हॅलेन्टाईन डेचे मुहूर्त निवडले आणि अनुष्का व त्याच्या एका फोटोसह शेअर केला एक सुंदरसा प्रेमाची कबुली देणारा मॅसेज. ‘तुझ्या मनात असेल तर प्रत्येक दिवस व्हॅलेन्टाईन डे आहे..’असा मॅसेज विराटने लिहिला. सोबत अनुष्काला टॅगही केले.  विराटची ही पोस्ट काही मिनिटांतच व्हायरल झाली, हे सांगणे नकोच.

ALSO READ : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली राहणार का लिव्हइनमध्ये ?
It’s Confirm! विराट-अनुष्काचा होणार नाही साखरपुडा; ‘त्या’सर्व अफवाच

यावर्षीच्या प्रारंभी विराट व अनुष्का साखरपुडा करणार असल्याची बातमी आली होती. मात्र ही बातमी अखेर अफवा ठरली. विराट व माझ्या साखरपुड्याची बातमी खोटी आहे, असा खुलासा अनुष्काने त्यावेळी केला होता. आता साखरपुडा नाही तर नाही किमान विराटने पे्रमाची कबुली दिली, हे काय कमी आहे.

Web Title: So Romantic !! Virat Kohli finally admits his love affair!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.