Salman Khan: तर आज जुही चावला असती सलमान खानची पत्नी, त्या कारणामुळे होऊ शकलं नाही लग्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 11:23 AM2023-03-16T11:23:39+5:302023-03-16T11:24:45+5:30
salman khan & juhi chawla : सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सलमान खान त्याला जुही चावलाशी विवाह करायचा होता, असं सांगताना दिसत आहे.
बॉलिवूडमधील सुपरस्टार सलमान खान ५७ वर्षांचा झाला आहे. मात्र उतारवय सुरू झालं तरी त्याचं लग्न होऊ शकलेलं नाही. सलमानचं लग्न कधी होणार, हा प्रश्न त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना पडलेला आहे. मात्र आता सलमान खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये सलमान खान त्याला जुही चावलाशी विवाह करायचा होता, असं सांगताना दिसत आहे.
हा व्हिडीओ १९९० च्या आसपासचा आहे. या व्हिडीओमध्ये जुही चावला खूप स्वीट आहे. मी तिच्या वडिलांकडे तिचा हात मागितला होता. मात्र त्यांनी त्याला नकार दिला, असं सलमान खान सांगताना दिसत आहे. त्यानंतर पत्रकार त्याला असं का घडलं म्हणून विचारतो. त्यावर सलमान खान म्हणाला की, त्यांनी नकार का दिला हे मला माहिती नाही. कदाचित मी त्यांना आवडलो नसेन.
सलमान खान आणि जुही चावला यांनी दीवाना मस्ताना या चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता. तर जुही चावलाने १९९५ मध्ये उद्योगपती जय मेहता यांच्याशी विवाह केला होता. तर सलमान खानचं सोमी अली, संगीता बिजलानी, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांच्यासोबत अफेअर राहिलं होतं. मात्र त्यांचं लग्न होऊ शकलेलं नाही. संगीता बिजलानी आणि सलमान खान यांचं नातं विवाहापर्यंत पोहोचलं होतं. पत्रिका छापल्या गेल्या होत्या. मात्र हे नातं ऐनवेळी तुटलं.
सध्याच्या वर्क फ्रंटचा विचार केल्यास सलमान खानचा पुढील चित्रपट किसी का भाई किसी की जान है हा यावर्षी ईद दिवशी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये सलमान खान आणि पूजा हेगडे दिसणार आहेत. त्याशिवाय यावर्षी सलमान खानचा चित्रपट टायगर ३ सुद्धा प्रदर्शित होणार आहे. त्यात तो कतरिना कैफ हिच्यासोबत दिसणार आहे. सलमान या वर्षी पठाण चित्रपटातही दिसला होता.