-म्हणून पत्नीने दीपक तिजोरीला काढले घराबाहेर...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2017 10:01 AM2017-04-04T10:01:30+5:302017-04-04T15:31:30+5:30
अभिनेता दीपक तिजोरी याची पत्नी शिवानी तोमरने त्यांच्यात झालेल्या मतभेदानंतर दीपकला घरा बाहेर काढलेयं. शिवाय घटस्फोटासह पोटगीची मागणीही केली ...
अ िनेता दीपक तिजोरी याची पत्नी शिवानी तोमरने त्यांच्यात झालेल्या मतभेदानंतर दीपकला घरा बाहेर काढलेयं. शिवाय घटस्फोटासह पोटगीची मागणीही केली आहे. पण दीपकचे मानाल तर शिवानी ही आपली कायदेशीर पत्नी नाहीच, असे त्याचे म्हणणे आहे. दीपक हा शिवानीचा दुसरा नवरा आहे. दीपकशी लग्न करताना शिवानीने पहिल्या पतीला घटस्फोट दिला नव्हता. त्यामुळे त्यांचे हे लग्न बेकायदेशीर आहे. त्यामुळे शिवानीने जरी घटस्फोटाची आणि पोटगीची मागणी केली असेल तरी दीपक त्या विरोधात आवाज उठवू शकतो, असे या प्रकरणात आत्तापर्यंत समोर आले आहे. पण हे प्रकरण इतक्या विकोपाला का जावे, हे आपल्याला कळले नव्हते. तर आता तेही उघड झाले आहे.
होय,दीपकच्या अफेअरमुळे शिवानी नाराज आहे. शिवानीने आता चुप्पी तोडत दीपकचे कारनामे जगजाहिर केले आहेत. दीपकसोबत मी २२ वर्षांपासून संसार करतेय. तो माझा पती आहे. पण आता त्याने सगळ्याच मर्यादा ओलांडल्या आहेत. मी आत्तापर्यंत चूप राहिले. हे आम्हा दोघांचे प्रकरण आहे म्हणून मी शांत बसले. पण मी त्याची पत्नी नाहीच, हे सागून दीपकने मर्यादा लांघली. माझ्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही. माझ्याजवळ सत्य आहे आणि सत्याचाच विजय होईल, हे मला ठाऊक आहे, असे शिवानी म्हणाली.
दीपकने १९८८ मधे आलेल्या ‘तेरा नाम मेरा नाम’ या सिनेमातून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. दिल,आशिकी, दिल है की मानता नहीं, खलाडी हे दीपकचे गाजलेले सिनेमे. मोठ्या पडद्यासोबतच त्याने छोट्या पडद्यावरही त्याने मालिकांची निर्मिती केली होती. तसेच त्याने गुजराती भाषेतही काम केले आहे. २००५ मध्ये दीपकने दिग्दर्शन क्षेत्रातही पाऊल टाकले.