सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडल सध्या आहे इंडस्ट्रीतून गायब, आता समोर आला गायिकेचा लेटेस्ट व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 02:24 PM2024-12-10T14:24:49+5:302024-12-10T14:25:23+5:30
Ranu Mandal: 'तेरी मेरी' हे गाणे गाऊन रानू मंडल लोकप्रिय झाली. मात्र त्यानंतर ती गायब झाली आहे. ती कुठे आहे, काय करते हे लोकांना जाणून घ्यायचे आहे. दरम्यान आता राणू मंडलचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
लता मंगेशकर यांच्या आवाजात गाताना एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लोकांनी या महिलेला रातोरात प्रसिद्ध केले होते. ही महिला दुसरी कोणी नसून रानू मंडल (Ranu Mandal) होती. राणूने तिच्या आवाजाने सर्वांना चकित केले. तिला बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधीही मिळाली. रानूला हिमेश रेशमियाने बॉलिवूडमध्ये लॉन्च केले होते. पण आता ती पुन्हा अनामिक झाली आहे. मात्र, आजही तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तिचे एक्सप्रेशन पाहून लोक हैराण झाले आहेत आणि त्यावर भरपूर कमेंट करत आहेत.
सोशल मीडिया इन्फ्लुयन्सर अंकिता मुखर्जीने राणू मंडलसोबतचा हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती तू तो साड्ढी केयर नहीं करदाहे गाणे गाताना दिसत आहे. अंकितासोबत उभी असलेली राणू मंडल विचित्र एक्सप्रेशन देत आहे, हा व्हिडीओ पाहून अनेक लोक तिची खिल्ली उडवत आहेत, कारण तिला गाण्याचे बोल बोलता येत नाहीत. रानू मंडल विचित्र हावभाव करत आहे.
नेटकऱ्यांनी रानू मंडलला केलं ट्रोल
रानू मंडल आणि अंकिताच्या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, तिला फक्त तेरी मेरी मेरी तेरी हेच माहीत आहे. तर दुसऱ्याने लिहिले की, आजीचा अभिनय. एकाने लिहिले की, व्वा व्वा. आणखी एकाने म्हटले, राणू दीदी किती दिवसांनी दिसली. रानू मंडल आता प्रसिद्धीपासून दूर गेली आहे. मात्र, तिचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतात, जे पाहून तिचे चाहतेही खूश होतात. पण आता ती बॉलिवूडपासून दूर आहे. रानू मंडलप्रमाणेच सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण रातोरात प्रसिद्ध झाले आहेत आणि आता बहुतांश लोक पुन्हा गायब झाले आहेत.