सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडलचा नवा व्हिडीओ आला समोर, लेकीसोबत डान्स करताना दिसली सिंगर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 16:02 IST2024-06-27T16:01:30+5:302024-06-27T16:02:12+5:30
Ranu Mondal : सोशल मीडिया सेंसेशन रानू मंडलचा लेटेस्ट व्हिडीओ व्हायरल होतो आहे. या व्हिडीओत ती तिच्या लेकीसोबत दिसत आहे.

सोशल मीडिया सेन्सेशन रानू मंडलचा नवा व्हिडीओ आला समोर, लेकीसोबत डान्स करताना दिसली सिंगर
सोशल मीडिया सेंसेशन रानू मंडल(Ranu Mondal)ला कोणत्याही परिचयाची गरज नाही. एका व्हिडीओतून रातोरात सोशल मीडियावर चर्चेत आली. तिला इतकी लोकप्रियता मिळाली की थेट तिला बॉलिवूडमध्ये गाणे गाण्याती संधी मिळाली. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक हिमेश रेशमियाने तिला त्याच्या अल्बमसाठी गाण्याची संधी दिली. मात्र हे स्टारडम ती फार काळ टिकवू शकली नाही. आता ती पुन्हा इंडस्ट्रीतून गायब आहे. मात्र आता बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतो आहे.
सोशल मीडियावर रानू मंडलचा व्हिडीओ पाहायला मिळतो आहे, ज्यात ती तिच्या लेकीसोबत दिसते आहे. या व्हिडीओत रानूची मुलगी मां तेरी आंचल में पलना है या गाण्यावर परफॉर्म करताना दिसली. रानूची मुलगी लाल पिवळ्या साडीत नटून थटून डान्स करते आहे. तर रानूची अवस्था पाहून नेटकरी हैराण झाले आहेत. या व्हिडीओत ती पिंक रंगाच्या नाइटीत दिसत आहे.
नेटकरी रानूला करताहेत ट्रोल
रानू मंडलच्या व्हिडीओ नेटकरी कमेंट्स करत तिला ट्रोल करत आहेत. तर काही जण तिची खिल्ली उडवत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिले की, हा ही तिचीच मुलगी असेल, तिच्यासारखेच गुण आहेत. दुसऱ्या युजरने लिहिले की, २-२ रानू मंडल कुठून आल्या. तिसऱ्या युजरने रानूला सल्ला देत लिहिले की, थोडासा बनावट अभिनय केला असता मॅम, कोणता सदमा लागलाय का. आणखी एकाने लिहिले की, दया पता करो कुछ तो गडबड है.