सोहा अली खान व कुणाल खेमूचा 'अॅडोप्टॅथॉन २०१८'ला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 16:18 IST2018-11-29T16:17:38+5:302018-11-29T16:18:09+5:30

वर्ल्ड फॉर ऑल्स ‘अॅडोप्टॅथॉन २०१८’ हे आशियातील सर्वांत मोठे दत्तक शिबिर पुन्हा एकदा मुंबईत पार पडणार आहे.

 Soha Ali Khan and Kunal Khemu support 'Adoptatthon 2018' | सोहा अली खान व कुणाल खेमूचा 'अॅडोप्टॅथॉन २०१८'ला पाठिंबा

सोहा अली खान व कुणाल खेमूचा 'अॅडोप्टॅथॉन २०१८'ला पाठिंबा

वर्ल्ड फॉर ऑल्स ‘अॅडोप्टॅथॉन २०१८’ हे आशियातील सर्वांत मोठे दत्तक शिबिर पुन्हा एकदा मुंबईत पार पडणार आहे. येत्या १ व २ डिसेंबरला वांद्रे पश्चिम येथील सेंट थेरेसाज बॉइज स्कूलमध्ये या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे आणि शिबीराला बॉलिवूडमधील काही कलाकार हजेरी लावणार आहेत.  

सोहा अली खान म्हणाली की, हे विश्वची माझे घर... आणि ते जसे माझे तसेच सर्वांचे या भावनेतून सुरू झालेले वर्ल्ड फॉर ऑल त्यांच्या वार्षिक अडॉप्टथॉन २०१८ साठी सज्ज झाले आहे. मुंबईतील वांद्रेतल्या सेंट. तेरेसा शाळेत १००-१८० गोड पपीज् आपल्या घराची वाट पाहत आहेत. इथे या आणि हेल्थी पपीजना आपल्या घरी घेऊन जा.
तर कुणाल खेमूने सांगितले की, हात-पाय नसूनही आपल्या खेळकर वृत्तीने तुम्हाला तुमच्या जगण्यातला आनंद मिळवून देणाऱ्या या पाळीव प्राण्यांना आपलंसे करण्यासाठीच हे ठिकाण... तेव्हा तुमच्या घरातल्या मस्तीखोर बाळाची जागा भरण्यासाठी नक्की या वार्षिक अडॉप्टथॉन २०१८ मध्ये येऊन या पपीज् आपल्या घरी घेऊन जा आणि त्यांच्या निर्व्याज प्रेमाचा अनुभव नक्की घ्या.
अॅडोप्टॅथॉन हा ‘वन स्टॉप अडॉप्ट’ कार्यक्रम असून यामध्ये दत्तक प्रक्रियेचे समन्वयक, पशूवैद्यकीय तज्ज्ञ, प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारे तज्ज्ञ, प्राण्यांच्या अन्नाचे विक्रेते, प्राण्यांसाठीच्या अॅक्सेसरीजचे विक्रेते, प्राण्यांसाठी बोर्डिंग्ज चालवणारे असे सगळे एका छताखाली उपलब्ध होतात. सहसा कमी लेखल्या जाणाऱ्या भारतीय प्रजातींच्या (केवळ कुत्रे व मांजरींच्या प्रजाती) साजरीकरणाचा हा सकारात्मक, जागरूकतेचा उत्सव आहे. सर्व क्षेत्रांतील प्राणीप्रेमींना आपल्या कुटुंबांसाठी एक छानसा पाळीव प्राणी दत्तक घेण्यासाठी हे एक व्यासपीठ आहे. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी सोहेल खानने येथूनच प्राणी दत्तक घेतला आणि स्थानिक चहावाल्यानेही येथूनच प्राणी दत्तक घेतला.

Web Title:  Soha Ali Khan and Kunal Khemu support 'Adoptatthon 2018'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.