बाबो ! सोहेल खान पत्नीसोबत मिळून चालवतो कोट्यवधींचा बिझनेस, मौलवीला किडनॅप करुन केला होता निकाह

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2021 12:42 PM2021-12-20T12:42:10+5:302021-12-20T13:03:04+5:30

‘प्यार किया तो डरना क्या’ हा दिग्दर्शक म्हणून सोहेलचा (Salman khan) पहिला सिनेमा होता. याच दरम्यान एक मुलगी फॅशन डिझाईनिंगमध्ये करिअर करण्यासाठी दिल्लीतून मुंबईला आली.सोहेल व तिची योगायोगाने भेट झाली

Sohail khan birthday some lesser known fact about him | बाबो ! सोहेल खान पत्नीसोबत मिळून चालवतो कोट्यवधींचा बिझनेस, मौलवीला किडनॅप करुन केला होता निकाह

बाबो ! सोहेल खान पत्नीसोबत मिळून चालवतो कोट्यवधींचा बिझनेस, मौलवीला किडनॅप करुन केला होता निकाह

googlenewsNext

अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सोहेल खान आज आपला 51वा वाढदिवस (Sohail khan birthday ) साजरा करतो. सोहेल खान म्हणायला अभिनेता आणि निर्माता आहे. पण सलमान खानचा (Salman khan) भाऊ हीच त्याची ओळख जास्त मोठी आहे. सोहेलने अनेक चित्रपटात भूमिका केल्यात. पण त्याला म्हणावे तसे यश लाभले नाही. अर्थात आज आम्ही सोहेलच्या फिल्मी करिअरबद्दल नाही तर त्याच्या लव्हलाईफबद्दल सांगणार आहोत. होय, घरच्यांचा विरोध पत्करून सोहेलने लग्न केले.

सोहेल खानने 1997 मध्ये दिग्दर्शक म्हणून करिअरची सुरुवात केली. ‘प्यार किया तो डरना क्या’ हा दिग्दर्शक म्हणून त्याचा पहिला सिनेमा होता. याच दरम्यान एक मुलगी फॅशन डिझाईनिंगमध्ये करिअर करण्यासाठी दिल्लीतून मुंबईला आली. तिचं नाव होतं सीमा सचदेव. सोहेल व तिची योगायोगाने भेट झाली आणि पहिल्याच नजरेत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले, लवकरच दोघांनी एकमेकांना डेट करणं सुरू केलं होतं. दोघांना लग्न करायचं होतं. पण सीमाच्या घरचे लोक या लग्नासाठी अजिबात तयार नव्हते.

त्यामुळे सीमा आणि सोहेलने एक मोठा निर्णय घेतला. ज्या दिवशी सोहेलचा 'प्यार किया तो डरना क्या' सिनेमा रिलीज झाला त्याच दिवशी दोघे घरातून पळून गेले होते आणि दोघांनी आर्य समाज मंदिरात लग्न केलं. यानंतर मध्यरात्री दोघांच्या लग्नासाठी मौलवीचेही अपहरण करण्यात आले. नंतर दोघांच्या घरवाल्यांनी हे नातं स्वीकारलं. या कपलने नंतर निकाह सुद्धा केला होता. आता त्यांना निर्वाण आणि योहान ही दोन मुले आहेत.


लग्नानंतर सोहेलने सीमासोबत मिळून एंटरटेन्मेंट बिझनेस सुरू केला.सोहेलचे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस देखील आहे जे तो त्याच्या पत्नीसह चालवतो.ब घता बघता सीमादेखील टीव्ही आणि सिनेमातील लिडींग फॅशन डिझायनर झाली. 'जस्सी जैसी कोई नही' या मालिकेचे कॉस्ट्यूम सीमाने डिझाइन केले होते. या मालिकेतून तिला ओळख मिळाली. सीमाचं वांद्रेमध्ये 'बांद्रा १९०' नावाचं बुटीक आहे. हे बुटीक ती सुझैन खान आणि महीप कपूरसोबत मिळून चालवते. तसेच सीमाचं मुंबईत ब्युटी स्पा आणि कलिस्ता नावाचे सलूनही आहे.

Web Title: Sohail khan birthday some lesser known fact about him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.