Sohail khan : एका सिनेमामुळे संपली सोहेल खान- पूजा भटची लव्हस्टोरी? वाचा, नेमकं काय घडलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 04:28 PM2022-12-20T16:28:41+5:302022-12-20T16:29:40+5:30

Sohail khan Birthday : आज सोहेल खान त्याचा वाढदिवस साजरा करतोय आणि यानिमित्ताने त्याच्या लव्हस्टोरीचा किस्सा सोशल मीडियावर व्हायरल होतोय...

Sohail khan birthday When Pooja Bhatt Was All Set To Tie The Knot With Sohail khan | Sohail khan : एका सिनेमामुळे संपली सोहेल खान- पूजा भटची लव्हस्टोरी? वाचा, नेमकं काय घडलं

Sohail khan : एका सिनेमामुळे संपली सोहेल खान- पूजा भटची लव्हस्टोरी? वाचा, नेमकं काय घडलं

googlenewsNext

Sohail khan Birthday : अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता सोहेल खान (Sohail khan) म्हणायला अभिनेता आणि निर्माता आहे. पण सलमान खानचा भाऊ हीच त्याची ओळख जास्त मोठी आहे. सोहेलने अनेक चित्रपटात भूमिका केल्यात. पण त्याला म्हणावं तसं यश लाभलं नाही. सध्या सोहेल त्याच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे. नुकताच त्याचा व त्याची पत्नी सीमा सजदेहचा घटस्फोट झाला आहे. ऐकून आश्चर्य वाटेल पण हाच सोहेल खान कधीकाळी पूजा भटच्या (Pooja Bhatt) प्रेमात होता. अगदी दोघंही लग्न करणार होत. खुद्द पूजाने एका जुन्या मुलाखतीत याचा उल्लेख केला होता.

मला सोहेल खूप आवडतो. त्याची फॅमिली अरबाज, त्याची आई, अलवीरा सगळ्यांनाच मी आवडते. पण सलमानसोबत माझं फारसं पटत नाही. आम्हाला लग्न तर करायचं आहे पण सोहेल सध्या आपल्या करिअरवर लक्ष देतोय. मी सुद्धा आणखी दोन वर्षे सिनेमे करू इच्छिते, असं पूजा म्हणाली होती. आता असं सगळं असताना  ही लव्हस्टोरी कशी संपली? असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. तर एक सिनेमा ही लव्हस्टोरी संपल्याचं कारण ठरला.

 होय, एका सिनेमामुळे संपली लव्हस्टोरी...
पूजा भट व सोहेल खानचं नातं संपुष्टात आलं ते एका सिनेमामुळे. अर्थात हा सिनेमा कधी बनलाच नाही. हा सिनेमा सोहेल खान दिग्दर्शित करत होता. यात सलमानच्या अपोझिट पूजा भटला कास्ट करण्यात आलं होतं. मात्र सलमान व पूजाची जोडी सलीम खान यांना मुळातच आवडली नव्हती आणि यामुळेच या चित्रपटाला त्यांचा विरोध होता. मीडिया रिपोर्टनुसार,  पूजा भटचा बोल्डनेस, तिची वादग्रस्त वक्तव्य आणि व्यसन हे सलीम खान यांना आवडत नव्हतं. पण सलमान कसंबसं वडिलांना राजी केलं आणि सिनेमाचं शूट सुरू झालं. याच सिनेमाच्या सेटवर पूजा व सोहेल एकमेकांच्या प्रेमात पडले. पूजा व सोहेलच्या प्रेमाची गाडी सूसाट धावायला लागली. पण  वाढत्या बजेटमुळे सिनेमा मात्र अर्ध्यात थांबला. कालांतराने सोहेल व पूजाच्या नात्याची खबर सलीम खान यांच्या कानावर गेलीच. मग काय खान कुटुंबात मोठा ‘हंगामा’ झाला. सिनेमा बंद पडलाच पण सोबत पूजा व सोहेलचं नातंही संपलं. 

असं म्हणतात की, पूजानं सोहेलला ठाम बजावलं होतं. तू सलमानचा भाऊ असशील पण तुझ्या कुटूंबियांचं माझ्याबद्दलचं मत बदललं पाहिजे. हे शक्य नसेल तर आपल्यातील नाते पुढे जाणार नाही, असं तिने सोहेलला स्पष्ट सांगितलं होतं. यानंतर काय झालं असावं, याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच.  पुढे पुजा भट कधीही सलमान, सोहेल, अरबाज सोबत दिसली नाही. एवढंच नाहीतर आलियानं देखील सलमानसोबत अद्याप काम केलेलं नाही.  
 

Web Title: Sohail khan birthday When Pooja Bhatt Was All Set To Tie The Knot With Sohail khan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.