रिसेप्शनला काही तास उरले असताना रणवीर सिंगने केले असे काही ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 17:20 IST2018-12-01T17:16:35+5:302018-12-01T17:20:32+5:30
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण14 नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमोमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नानंतर पहिलं रिसेप्शन दीपवीरने बेंगळुरुमध्ये पहिलं तर मुंबईत दुसरं रिसेप्शन दिले.

रिसेप्शनला काही तास उरले असताना रणवीर सिंगने केले असे काही ट्वीट
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण 14 नोव्हेंबरला इटलीतील लेक कोमोमध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. लग्नानंतर पहिलं रिसेप्शन दीपवीरने बेंगळुरुमध्ये पहिलं तर मुंबईत दुसरं रिसेप्शन दिले. मुंबईत आधी झालेल्या रिसेप्शन त्यांच्या कुटुंबियांसाठी आणि मीडियासाठी आयोजित करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा या जोडीने एका ग्रँड पार्टीचे आयोजन केले आहे. आजची पार्टी खास बी-टाऊनमधील मंडळींसाठी आयोजित केली आहे.
मुंबईतल्या रिसेप्शनच्या काही तास आधीच रणवीरने त्याच्या फॅन्सना एक खास ट्वीट केले आहे. त्याचे झाले असे की, रणवीरने त्याचा आगामी सिनेमा सिम्बाचे नवे पोस्टर ट्वीट केले आहे. या सिनेमाच्या ट्रेलर येत्या सोमवारी रिलीज होणार आहे. पोस्टर ट्वीट करताना रणवीरने त्याला एक कॅप्शनदेखील दिले आहे. 'सिम्बा आला...फक्त दोन दिवस थांबा..'
SIMMBA AALA .... Bas 2 दिन थांबा 🔥💪🏽👊🏽 #Simmba#SimmbaTrailer#RohitShetty@karanjohar#SaraAliKhan@SonuSoodpic.twitter.com/CsyJk78i6d
— Ranveer Singh (@RanveerOfficial) December 1, 2018
'सिम्बा' सिनेमात रणवीर सिंग सोबत सैफ अली खानची मुलगी सारा अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाची निर्मिती करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनर अंतर्गत निर्मिती केली जात आहे.' सिम्बा' हा चित्रपट साऊथच्या 'टेम्पर' या सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. टेम्परमध्ये अभिनेत्रीचे काम फक्त प्रेमिकाच्या भूमिकेपर्यंत होते. मात्र 'सिम्बा'मध्ये सारा आणि रणवीरमध्ये एक सुंदर लव्हस्टोरी दाखवण्यात येणार आहे.सिम्बा या सिनेमात रणवीरपहिल्यांदा पोलिस कर्मचा-याच्या भूमिकेत आहे. ३ डिसेंबरला 'सिम्बा'चा ट्रेलर प्रदर्शित केला जाणार आहे व २८ डिसेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.