रणवीर सिंगला घरी यायला उशीर झाला की दीपिका पादुकोण करते असे काही
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2024 19:22 IST2024-09-30T19:21:49+5:302024-09-30T19:22:39+5:30
Deepika Padukone And Ranveer Singh : दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग ८ सप्टेंबर रोजी पालक झाले. त्यांनी आपल्या घरी चिमुकलीचे स्वागत केले. अभिनेत्री सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे.

रणवीर सिंगला घरी यायला उशीर झाला की दीपिका पादुकोण करते असे काही
दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि रणवीर सिंग (Ranveer Singh) ८ सप्टेंबर रोजी पालक झाले. त्यांनी आपल्या घरी चिमुकलीचे स्वागत केले. अभिनेत्री सध्या तिच्या मातृत्वाचा आनंद घेत आहे. चित्रपटांमधून ब्रेक घेत ती आपल्या मुलीची पूर्ण काळजी घेत आहे. गेल्या काही काळापासून दीपिका चित्रपटांपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर चाहत्यांशी सतत जोडलेली असते आणि काही ना काही पोस्ट शेअर करत असते.
काही दिवसांपूर्वी तिने आई बनल्यानंतर आयुष्य किती बदलते याची एक पोस्ट शेअर केली होती आणि आता नुकतीच तिने पती रणवीर सिंगबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे, जी पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही. मुलीच्या जन्मानंतर, दीपिका पादुकोणने तिचे इन्स्टा बायो बदलून फीड, बर्प, झोप आणि रिपीट असे लिहिले आहे. याशिवाय तिने यापूर्वी आईशी संबंधित अनेक पोस्ट शेअर केल्या होत्या.
आता अलीकडेच 'सिंघम अगेन' अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा पोस्टवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यात एखाद्या मुलीचा नवरा दिलेल्या वेळेत घरी आला नाही तर ती खिडकीजवळ उभी राहून त्याची वाट पाहते असा फोटो आहे. या मीममध्ये कॅप्शन लिहिले की, "माझे पती मला सांगतात की तो ५ वाजता घरी येईल, म्हणून मी ५:१ मिनिटाला...". या पोस्टमध्ये दीपिका पादुकोणने रणवीर सिंगला टॅग करताना एक मजेदार इमोजी शेअर केला आहे.
लग्नाच्या सहा वर्षांनी केले बाळाचे स्वागत
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील सर्वात क्युट जोडप्यांपैकी एक आहेत. चाहतेही त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला मागेपुढे पाहत नाहीत. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग यांची प्रेमकहाणी संजय लीला भन्साळी यांच्या 'राम-लीला' चित्रपटाच्या सेटवर सुरू झाली. दोघांनीही बरेच दिवस आपले नाते लपवून ठेवले होते. २०१८ मध्ये, दोघांनीही कुटुंब आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत इटलीतील लेक कोमो येथे लग्न केले. लग्नाच्या सहा वर्षांनंतर हे जोडपे आई-बाबा झाले आहेत.