सोमी अलीने सोनू निगमवर फसवल्याचा आणि फायदा घेतल्याचा केला आरोप, म्हणाली - "त्याने माझा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 05:28 PM2024-09-27T17:28:21+5:302024-09-27T17:30:08+5:30
Somy Ali : सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता तिने गायक सोनू निगमवर आरोप केले आहेत
सलमान खान(Salman Khan)ची एक्स गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री सोमी अली (Somy Ali) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता तिने गायक सोनू निगम(Sonu Nigam)वर आरोप केले आहेत. सोमीने इंस्टाग्रामवर एक लांबलचक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये गायकासाठी बरेच काही म्हटले आहे. अभिनेत्री सोमी अलीनेसोनू निगमवर फसवणुकीचा आरोप केला आहे. तिने इंस्टाग्रामवर एक लांबलचक व्हिडिओ शेअर केला असून कॅप्शनही लिहिले आहे. त्यात ती म्हणते, 'लोक असे असतात आणि अशा प्रकारे तुमचा गैरफायदा घेतात. सोनू निगम त्याच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्या इतरांचे व्हिडिओ बनवतो. मी हैराण आहे.
सोमीने पुढे लिहिले की, 'मला या व्यक्तीबद्दल खूप आदर होता. पण पुस्तकाला त्याच्या मुखपृष्ठावरून चांगले की वाईट ठरवता येत नाही. माझ्यावर विश्वास ठेवा माझी फसवणूक झाली आहे आणि मी त्याची कल्पनाही करू शकत नाही. माझा अजूनही विश्वास बसत नाही. ज्याने माझ्यासोबत हे केले आहे तो सोनू निगम आहे. सोमी म्हणाली, 'त्याच्यापासून दूर राहा. त्याला व्हिडिओ बनवायला आवडते. त्याने माझा वापर केलाय आणि गैरव्यवहार केला आहे. असे लोक समाजासाठी घातक असतात. तरीही मला त्याची गाणी आवडतात. तो गटाराच्या पातळीपर्यंत जाईल अशी मला अपेक्षा नव्हती.
सोमी अलीने व्हिडीओ बनवून केला संताप व्यक्त
व्हिडीओमध्ये सोमी म्हणते की आज ती अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहे ज्याचा प्रत्येकाने आयुष्यात सामना केला असेल. तिचा वापर झाल्याचे लक्षात आल्याचे तिने सांगितले. तिची फसवणूक झाली आहे. 'मुर्ख बनवणे, गैरफायदा घेणे, आम्ही या सर्व गोष्टींमधून गेलो आहोत. मला माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर करायचा आहे.
सोनू निगमने लावली होती सोमी अलीच्या टॉक शोमध्ये हजेरी
काही काळापूर्वी मी माझा स्वतःचा टॉक शो सुरू केला. मी काही लोकांच्या मुलाखतीही घेतल्या. एक माणूस त्यात आला आणि त्याने खूप माहितीपूर्ण गोष्टी सांगितल्या. हे ऐकून मला वाटले की तो खरोखरच समजदार माणूस आहे. तो स्वतः जे बोलतो त्यावर विश्वास ठेवतो. पण नंतर जेव्हा मी त्याच्या फायद्यासाठी त्याच्याशी संपर्क साधला तेव्हा त्याने माझ्या मेसेजला प्रतिसाद दिला नाही.
सोनू निगमवर अपमान केल्याचा केला आरोप
सोमी पुढे म्हणाली, 'मला नंतर वाटले की कदाचित तो शोमध्ये येण्यासाठी उत्साहित आहे. टॉक शोमध्ये हजेरी लावण्यासाठी त्याने पैसेही घेतले नाहीत. कारण आम्हाला पैसेही देता येत नव्हते. तो एक छोटासा टॉक शो होता. आमच्याकडे प्रायोजक नव्हते. पण नंतर मला कळले की ज्या व्यक्तीचा मी आदर करते ते माझ्या शोमध्ये एका उद्देशाने आले होते. दुसऱ्या माणसाकडून सूड घेणे हा त्याचा उद्देश होता. ज्यांच्याशी मी मुंबईत जोडले गेले होते.
सोमी अली सोनू निगमवर चिडली
सोमी पुढे म्हणाली, 'मला समजले की तो शोमध्ये आला होता जेणेकरून तो त्याच्या एक्सला दाखवू शकेल की मी तुमच्या एक्सच्या शोमध्ये आहे. हा विषय थोडा थंड झाल्यावर मी त्याला आणखी एक संधी देण्याचा प्रयत्न केला. त्याने माझ्याशी बोलण्यास नकार दिला. मी तीन वेळा प्रयत्न केला. पण तो काही बोलला नाही.