धक्कादायक! 'त्याने मला शिव्या दिल्या, मारहाण केली' सलमान खानच्या Ex गर्लफ्रेंडचे त्याच्यावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2023 12:20 PM2023-01-06T12:20:32+5:302023-01-06T12:51:08+5:30

सलमान खानवर अभिनेत्रीने मारहाणीचा खळबळजनक आरोप केला आहे. ती म्हणाली, मी मुंबईत असताना सलमान खान मला शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा...

Somy ali reveals did Salman actually broke a bottle on her head breakup controversy | धक्कादायक! 'त्याने मला शिव्या दिल्या, मारहाण केली' सलमान खानच्या Ex गर्लफ्रेंडचे त्याच्यावर गंभीर आरोप

धक्कादायक! 'त्याने मला शिव्या दिल्या, मारहाण केली' सलमान खानच्या Ex गर्लफ्रेंडचे त्याच्यावर गंभीर आरोप

googlenewsNext

अभिनेत्री सोमी अली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. सोमा अली सलमान खानसोबत जवळपास 8 वर्षे नात्यात होती.  पण काही काळानंतर त्यांचे ब्रेकअप झाले. अभिनेत्रीने सलमानवर अनेकदा गंभीर आरोप केले होते. गेल्या वर्षी, सोमीने तिच्या एका सोशल मीडिया पोस्टमध्ये सलमानला 'महिलांना मारहाण करणारा' आणि 'लैंगिक शोषण' करणार असं म्हटलं होते. पुन्हा एकदा सोमीने सलमानबद्दल असे काही बोलले ज्यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अलीनेही बॉलिवूडमध्ये काम केले आहे. अलीकडेच तिच्या एका पोस्टमुळे चर्चेत आली आहे. त्याने फोटोसह कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'सलमान खानसोबत जे काही घडले त्याबद्दल बाहेर येण्यास आणि बोलण्यास तुम्हाला इतका वेळ का लागला? ही कोणत्याही प्रकारे ब्रेकिंग न्यूज नाही. 90 च्या दशकाच्या सुरुवातीपासून ते 1999 पर्यंत कोणत्याही टॅब्लॉइड किंवा चित्रपट मासिकात जा आणि तुम्हाला सलमानने सोमीचे शारीरिक शोषण केल्याबद्दलचे लेख वाचायला मिळतील. '


सोमी पुढे म्हणाली, 'मला राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एचडब्ल्यू बुश यांच्याकडून पुरस्कार मिळाला आहे. माझ्या एनजीओबद्दल माझं खूप कौतुक झालं आहे. तरीही तुम्हाला असे वाटते की मला पब्लिसिटी स्टंट करण्याची गरज आहे. 

ही पोस्ट शेअर करून सोमीने सलमान खानला फटकारले आणि त्याच्यावर मारहाणीचा खळबळजनक आरोपही केला. तिने लिहिले, 'मी मुंबईत असताना सलमान खान मला शिवीगाळ करायचा, मारहाण करायचा. माझ्या घरच्या मदतनीसाने माझे रडणं पाहिले आहे. माझी आरडाओरड ऐकून तिनं मला मारणं थांबवाव, असेही सांगितले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांचे नाते 1991 ते 1999 पर्यंत टिकले. नुकतेच फ्री प्रेस जर्नलशी बोलताना तिनं सलमान खानसोबतचे 8 वर्षे जुने नाते का तुटले याचा खुलासा केला. सोमी म्हणाली- 'तुम्ही नात्यात आनंदी नसाल तर वेगळे होणे चांगले. सलमान आणि माझ्या नात्याची ही स्थिती होती आणि मी अमेरिकेला परत जाण्याचा निर्णय घेतला.

Web Title: Somy ali reveals did Salman actually broke a bottle on her head breakup controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.