सलमानच्या नावाने कानाला खडा! भाईजानची ‘एक्स’ सोमी अली म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 02:26 PM2021-07-19T14:26:57+5:302021-07-19T14:29:22+5:30

एकेकाळी सलमान खान सोमीच्या प्रेमात वेडा झाला होता. असं म्हणतात की, तिच्यासाठीच त्यानं संगीता बिजलानीला सोडलं होतं.

somy ali speaks about salman khan says psychologically it is healthier for her to not be in touch with him | सलमानच्या नावाने कानाला खडा! भाईजानची ‘एक्स’ सोमी अली म्हणाली...

सलमानच्या नावाने कानाला खडा! भाईजानची ‘एक्स’ सोमी अली म्हणाली...

googlenewsNext
ठळक मुद्देसोमी मुळची पाकिस्तानची. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ती ओळखली जाते.

एकेकाळी सलमान खान (Salman Khan) सोमी अलीच्या (Somy Ali)  प्रेमात वेडा झाला होता. असं म्हणतात की, तिच्यासाठीच त्यानं  संगीता बिजलानीला सोडलं होतं. अर्थात इतकं करूनही सलमान-सोमीचं नातं फार काळ चाललं नाही. सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर सोमी भारत सोडून गेली ती कायमचीच. आता तर सलमानचं नावं काढायलाही तिला नकोय. मनाच्या शांतीसाठी सलमानपासून दूर राहिलेलंच बरं, असं सोमी म्हणते.
ई-टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत सोमी पर्सनल आयुष्यावर बोलली. तू आजही सलमानच्या संपर्कात आहेस का? असा प्रश्न केला असता, पाच वर्षांपासून मी त्याच्याशी बोललेली नाही, असं ती म्हणाली. आता मी आणि तो दोघेही आपआपल्या आयुष्यात  पुढे निघून गेलो आहोत. डिसेंबर 1999 मध्ये माझं व त्याचं ब्रेकअप झालं. तेव्हापासून आत्तापर्यंत त्याच्या किती गर्लफ्रेन्ड्स आहेत, मला ठाऊक नाही. त्याची एक एनजीओ आहे आणि तो चांगलं काम करतोय, हे मला ठाऊक आहे, असं ती म्हणाली.

त्याच्यापासून दूर राहणंच उत्तम
माझ्या मते, सलमानपासून दूर राहणं हेच माझ्यासाठी, माझ्या मानसिक आरोग्यासाठी उत्तम आहे. तो आज खूप मोठा सुपरस्टार आहे, याचा मला आनंद आहे. बाकी गोष्टींशी मला काहीही देणंघेणं नाही, असंही ती म्हणाली.

लग्नावर माझा विश्वास नाही...
लग्नाबद्दलही सोमी बोलली. लग्न व्यवस्थेवर माझा विश्वास नाही. ही अशी व्यवस्था आहे, जिथं जायलाही तुम्ही उत्सुक असता आणि बाहेर पडलाही तेवढेच उत्सुक असता. तूर्तास तरी लग्नाचा इरादा नाही. पण हो, एखादा मनासारखा पुरूष मिळाला तर मी त्याच्याबद्दल विचार करू शकते. मी एक एनजीओ चालवते. रात्रीबेरात्री पोलिसांचे फोन येतात आणि फोन आल्यावर मी लगेच पोलिस स्टेशनला पीडिताच्या मदतीसाठी हजर होते. हे समजणारा पार्टनर मला हवा, असंही ती म्हणाली.

सोमी मुळची पाकिस्तानची. बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल म्हणून ती ओळखली जाते. सोमीची आई इराकी आणि वडील पाकिस्तानी आहेत. 12 वर्षांपर्यंत सोमी पाकिस्तानात शिकली. यानंतर आपल्या पालकांसोबत फ्लोरिडाला शिफ्ट झाली. सोमीला सुरुवातीपासूनच बॉलिवूडमध्ये करियर करायचे होते. पण ती बॉलिवूडमध्ये येण्याचे सर्वात मोठे कारण सलमान खान होते. होय, सलमानवर लहानपणापासूनच सोमीचे क्रश होते. ‘मैंने प्यार किया’ पाहिल्यानंतर सलमानसोबतच लग्न करायचे, असे तिने ठरवले होते. सोमीचा कल बघून तिच्या आईने तिला मुंबईला पाठवले. पण सोमीला बॉलिवूडपेक्षाही सलमान हवा होता. खरे सांगायचे तर सलमानचा पिच्छा करत करतच ती फ्लोरिडावरून मुंबईत पोहोचली होती. यावेळी ती केवळ 16 वर्षांची होती. सलमान आणि सोमी आठ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. सोमीने 1991 ते 1997 या काळात सुमारे दहा चित्रपटात काम केले. 1999मध्ये तिचे आणि सलमानचे ब्रेकअप झाले. याचे कारण होते, ऐश्वर्या राय. या ब्रेकअपनंतर सोमीने बॉलिवूड सोडले आणि ती पुन्हा कधीच बॉलिवूडमध्ये दिसली नाही. 

 

Web Title: somy ali speaks about salman khan says psychologically it is healthier for her to not be in touch with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.