'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 12:51 PM2024-11-27T12:51:23+5:302024-11-27T12:53:36+5:30

'सन ऑफ सरदार', 'आप्पा आणि बाप्पा' या हिंदी - मराठी सिनेमांचं दिग्दर्शन करणारे अश्विनी धीर यांच्या मुलाचं निधन झालंय

Son of Sardar director ashwini dhir son jalaj dhir passed away in car accident vile parle | 'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन

'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन

मनोरंजन विश्वातून दुःखद बातमी समोर येतेय. बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणारे प्रसिद्ध दिग्दर्शक अश्विनी धीर यांंच्या मुलाचा भीषण अपघातात दुर्देवी मृत्यु झालाय. जलज धीर असं त्याचं नाव असून तो अवघ्या १८ वर्षांचा होता. भयानक कार अपघातामध्ये जलजचं निधन झालं. या घटनेमुळे सर्वांनाच जबर धक्का बसलाय. हा अपघात कसा झाला याविषयीची माहिती समोर आलीय.

(Son of Sardar director ashwini dhir son jalaj dhir passed away in car accident vile parle)

वडिलांना भेटणार होता पण...

२३ नोव्हेंबरला जलजचा मित्र साहिल मेंधा नशेमध्ये गाडी चालवत होता. त्यावेळी जलज त्याच्या तीन मित्रांसोबत त्या गाडीतून प्रवास करत होता. गोव्यात होणाऱ्या IFFI मध्ये सहभागी होण्यासाठी जलज वडिलांसोबत जाणार होता. परंतु त्याचा मित्र नशेच्या अंमलामध्ये तब्बल १२०-१५० च्या स्पीडने गाडी चालवत होता. परिणामी विले पार्ले येथील सर्व्हिस रोडजवळील डिवायडरला गाडी जोरात आदळली.

आरोपीला पोलिसांनी ढोकल्या बेड्या...

या घटनेत जलज आणि त्याचा मित्र सार्थक कौशिकचाही दुर्देवी मृत्यु झाला. जलजच्या दुसऱ्या मित्राने गाडी चालवणाऱ्या मित्राची पोलिसांकडे तक्रार केली. पुढे पोलिसांनी साहिल मेंधाला बेड्या ठोकल्या. जलज मित्रासोबत रात्री घरीच होता. पहाटे ३.३० वाजता तो तीन मित्रांसोबत व्हिडीओ गेम खेळत होता. पुढे सर्वजण वांद्रे येथे ड्राइव्हवर गेले. त्यांनी जेवण केल्यावर पहाटे ४.१० च्या सुमारास ते परतत असताना साहिलचं कारवरचं नियंत्रण सुटलं. यात जलज गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु दुर्दैवाने त्याचं निधन झालं. लेकाच्या निधनाने अश्विनी यांना जबर धक्का बसला आहे.

Web Title: Son of Sardar director ashwini dhir son jalaj dhir passed away in car accident vile parle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.