Neha Kakkar : रिमिक्सच्या वादात सोना मोहपात्राची उडी, नेहा कक्करवर भडकली, केली कारवाईची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 01:22 PM2022-09-26T13:22:12+5:302022-09-26T13:24:10+5:30
Falguni Pathak-Neha Kakkar remix row : नेहा कक्करने फाल्गुनीचं ‘मैंने पायल है छनकाई’ हे गाणं रिक्रिएट केलं आणि फाल्गुनी भडकली. आमच्या सुंदर गाण्यांची वाट लावू नकोस, असं म्हणत तिने नेहाला फटकारलं. आता या वादात सिंगर सोना मोहपात्राने (Sona Mohapatra) उडी घेतली आहे.
सिंगर फाल्गुनी पाठक (Falguni Pathak) व नेहा कक्कर ( Neha Kakkar) यांच्यातील वाद सर्वांनाच ठाऊक आहे. नेहा कक्करने फाल्गुनीचं ‘मैंने पायल है छनकाई’ हे गाणं रिक्रिएट केलं आणि फाल्गुनी भडकली. आमच्या सुंदर गाण्यांची वाट लावू नकोस, असं म्हणत तिने नेहाला फटकारलं. आता या वादात सिंगर सोना मोहपात्राने (Sona Mohapatra) उडी घेतली आहे.
म्युझिक इंडस्ट्री व बॉलिवूडने यावर बोलायला हवं, असं म्हणत सोनाने नेहाच्या रिमिक्स गाण्यावर टीका केली आहे.
I can only hope that the music labels & #Bollywood film producers killing the creative community & creators by commissioning short-cuts; remakes, remixes take note of the public backlash on the recent #FalguniPathak hit. Also, dear #India , do stand up more often to such 🙏🏾♥️
— Sona Mohapatra (@sonamohapatra) September 26, 2022
सोनाने एक ट्विट केलं आहे. ‘मी आशा करते की म्युझिक लेबल, बॉलिवूड फिल्ममेकर्स व क्रिएटीव्ह टीमने अशा क्रिएटीव्ही संपवणाऱ्या शॉर्ट-कटविरोधात बोलायला हवं. फाल्गुली पाठकच्या हिट रिमेककडे लक्ष द्या. भारतातील लोकांनीही याविरोधात उभं व्हायला हवं,’ अशा आशयाचं ट्विट सोनाने केलं आहे.
‘मैंने पायल है छनकाई’ हे मूळ गाणं फाल्गुनी पाठक हिने गायिलं आहे. याच गाण्याचं नेहाने गायलेलं रिमिक्स व्हर्जन 19 सप्टेंबर प्रदर्शित झालं. या गाण्यात नेहासोबत क्रिकेटपटू युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा आणि प्रियांक शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. या गाण्याला तनिष्क बागचीनं म्यूझिक दिलं आहे.
काय म्हणाली फाल्गुनी?
‘मैंने पायल है छनकाई’चं नेहा कक्करने गायलेलं रिमिक्स व्हर्जन ऐकल्यानंतर फाल्गुनीने अतिशय जळजळीत प्रतिक्रिया दिली होती. ‘ मी हे रिमिक्स गाणं ऐकलं. पहिली प्रतिक्रिया चांगली नव्हती. मला फक्त उलटी येणंच बाकी होती. गायिकेने इतक्या सुंदर ओरिजनल गाण्याची वाट लावली. ओरिजनल गाण्यातील व्हिडीओत आणि पिक्चराइजेशनम्ये जो काही निष्पाप भाव होता, त्याचा पुरता सत्यानाश केला. रिमिक्स करता तर चांगल्या प्रकारे करा. युवा पिढीपर्यंत पोहोचवू इच्छिता तर मूळ गाण्याची लय बदला. अशा पद्धतीने त्याची वाट लावू नका. माझ्या चाहत्यांनाही रिमिक्स व्हर्जन आवडलेलं नाही. मग मी शांत कशी बसणार? ’,असं फाल्गुनी एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली होती.
फाल्गुनी पाठकने इन्स्टाग्राम अकाऊंटवर नेहाच्या गाण्याचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. हा स्क्रीनशॉट शेअर करत तिने, ‘नेहा कक्कर तू आणखी किती खालच्या पातळीला उतरणार आहे? आमच्या जुन्या क्लासिक गाण्यांची वाट लावणं बंद कर,’ या आशयाचं कॅप्शन दिलं होतं.
नेहाने दिलं उत्तर
दरम्यान फाल्गुनी पाठकच्या टीकेला नेहा कक्करनेही उत्तर दिलं होतं. ‘मी आयुष्यात जे कमावले आहे ते देशातील फार कमी लोकांच्या नशीबात असेल. इतक्या कमी वयात लोकप्रियता, इतकी हिट गाणी, सुपरडुपर हिट टीव्ही शो, वर्ल्ड टूर, लहान मुलांपासून 80-90 वर्षांचे चाहते आणि बरेच काही. पण हे सहजी मिळालेलं नाही. कष्ट, टॅलेंट, कामाची ओढ, सकारात्मक विचार या सर्व गोष्टींच्या आधारावर मला हे सर्व मिळालं आहे. मला देवाने आजपर्यंत जे काही दिले आहे त्यासाठी मी देवाचे आभार मानते. मी देवाची लाडकी आहे आणि त्यासाठी खरच मनापासून आभार,’अशी पोस्ट नेहाने शेअर केली होती.