"तेरे मस्त मस्त दो नैन", सोनाक्षी-जहीरचा रोमँटिक डान्स, रिसेप्शन सोहळ्यातील व्हिडिओ समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 10:14 AM2024-06-24T10:14:13+5:302024-06-24T10:14:54+5:30

Sonakshi Sinha Wedding : लग्नानंतर वेडिंग रिसेप्शनमध्ये सोनाक्षी आणि जहीर रोमँटिक झालेले पाहायला मिळाले. या वेडिंग रिसेप्शनमधील त्यांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत.

sonakshi sinha and zaheer iqbal wedding newly wed couple romantic dance on tere mast mast do nain song watch video | "तेरे मस्त मस्त दो नैन", सोनाक्षी-जहीरचा रोमँटिक डान्स, रिसेप्शन सोहळ्यातील व्हिडिओ समोर

"तेरे मस्त मस्त दो नैन", सोनाक्षी-जहीरचा रोमँटिक डान्स, रिसेप्शन सोहळ्यातील व्हिडिओ समोर

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी रविवारी(२३ जून) लग्नबंधनात अडकून नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. कुटुंबीय आणि मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत सोनाक्षी आणि जहीरने रजिस्टर पद्धतीने लग्न केलं. लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरचं वेडिंग रिसेप्शन मुंबईत पार पडलं. त्यांच्या वेडिंग रिसेप्शन सोहळ्यातील फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. 

लग्नानंतर वेडिंग रिसेप्शनमध्ये सोनाक्षी आणि जहीर रोमँटिक झालेले पाहायला मिळाले. या वेडिंग रिसेप्शनमधील त्यांचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. लग्नानंतर दोघांनाही गाण्यांवर ठेका धरत डान्स केल्याचं व्हिडिओत पाहायला मिळत आहे. सोनाक्षी आणि जहीर व्हिडिओत एन्जॉय करत असल्याचं दिसत आहे. 

सोनाक्षीच्या "तेरे मस्त मस्त दो नैन" या गाण्यावर नवविवाहित जोडप्याने डान्स केला. त्यानंतर "सारी के फॉल सा" या गाण्यावरही सोनाक्षी आणि जहीर थिरकताना दिसले. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

वेडिंग रिसेप्शनसाठी सोनाक्षी लाल रंगाची साडी नेसून नववधूप्रमाणेच नटली होती. केसांत गजरा आणि मोजकेच दागिने परिधान करत तिने अगदी सिंपल लूक केला होता. तिने भांगेत कुंकूही भरलं होतं. नववधू सोनाक्षीच्या या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. लग्नात फिकट रंगाचा आणि भरजरी लेहेंग्याचा बॉलिवूड अभिनेत्रींचा ट्रेंड बदलत नववधू सोनाक्षीने लाल रंगाला पसंती दिली. तर जहीरने ऑफ व्हाइट रंगाचा सूट परिधान केला होता. 

लग्नानंतर सोनाक्षी आणि जहीरने मुंबईत वेडिंग रिसेप्शन ठेवलं होतं. या वेडिंग रिसेप्शनला बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. सोनाक्षी आणि जहीर गेल्या ७ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. आता त्यांनी लग्न करून आयुष्यभर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. सोनाक्षीप्रमाणेच जहीरदेखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. अभिनयाबरोबरच तो मॉडेलिंगदेखील करतो. सोनाक्षी आणि जहीरने डबल XL सिनेमात एकत्र काम केलं होतं. जहीरचे वडील व्यावसायिक असून त्याचे सलमान खानशीही मैत्रीपूर्ण संबंध आहेत.
 

Web Title: sonakshi sinha and zaheer iqbal wedding newly wed couple romantic dance on tere mast mast do nain song watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.